MALEGAON मध्ये वाढत्या तापमानामुळे शेतकरी चिंतेत, डाळिंबांना गुंडाळले कापड, अनोख्या उपक्रमाचं परिसरात कौतुक
वाढत्या तापमानात डाळिंब पीक वाचण्यासाठी मालेगावच्या तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने डाळिंबांना गुंडाळले कापड, अडीच एकरात केले संपूर्ण आच्छादन केला आहे. 'एक अनार, सौ बीमार' ही म्हण हिंदीमध्ये प्रसिद्ध आहे. डाळिंब खाण्यासाठी लोक आजारी पडतात, असा या म्हणीचा अर्थ आहे.
मात्र, मालेगावच्या लखन आहेर या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील डाळिंब उन्हाच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी केलेला अफलातून प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रयोग परिसरात इतका हीट झाला आहे, की परिसरातील शेतकऱ्यांनी देखील तसाच प्रयोग सुरू केला आहे. कमाल तापमान चाळीस अंशांवर गेल्यास डाळिंब फळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात, फळे काळी पडून तडकतात, दाणे फळाबाहेर पडतात. यातून बचावासाठी मालेगांवच्या शेतकऱ्याने केला अनोखा प्रयोग.