मापड्यांचे येणार अच्छे दिन!
मापड्यांचे तोलाई दर वाढीची संकेत बाजार समिती घेणार निर्णय?
गेली १९ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले मापाडी या बाजार घटकाला अच्छे दिन येणार असल्याचे दिसत आहे. आता पणन संचालकांनी बाजार समितीला विश्वासात घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी तोलाई मजुरीची दरवाढ याबाबत निर्णय घेण्याचे परिपत्रक जाहीर केल्याने मापांड्याना दरवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दरवाढीबाबत गेली अनेक वर्षांपासून मापाडी प्रतिक्षेत होते. शिवाय सातत्याने मापाडी संघटना याचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांच्या मागणीला यश येत नव्हते. मात्र, आता दरवाढीचा मार्ग सुकर झाल्याने मापाडी समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या १९ वर्षातील महागाई दर पहाता हि दरवाढ आतापर्यंत अनेक टप्प्यात होणे अपेक्षित होते.