मुंबई APMC फळ मार्केटमध्ये हापूस आंबे झाले स्वस्त!
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आता आंबा सामान्य लोकांच्या आवाक्यात येऊ लागल्याचे दिसत आहे. फळ मार्केटमध्ये आज जवळपास ३० हजार पेटी आंबे रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग येथून आवक झाली आहे. तर आंबे स्वस्त झाले असून ४ ते ५ डझन पेटीला १ हजार ते ३ हजार रुपये दर आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी ५ हजार ते १५ हजार पेटी बाजारात आवक येत होती. मात्र आता ती ३० हजारांवर गेली आहे. तर आवक वाढल्याने दरात घसरण होऊन ग्राहक खरेदीत वाढ झाली आहे.
मात्र, कोकण हापूस आंबा तपासून घेण्याची गरज आहे. कारण काही व्यापारी कर्नाटक हापूस आंबा कोकण हापूस म्हणून विक्री करत आहेत. जर तुम्ही आंबा खरेदीसाठी मुंबई APMC फळ मार्केटमध्ये जात असाल तर हि सावधगिरी नक्की बाळगा. मात्र, दरात घसरण झाल्याने सामान्य लोकांचे पाय आंबा खरेदीसाठी येत आहे. तर लवकरच आणखी आंबा आवक बाजारात येऊन दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आंबा लवकरच सामन्यांच्या आवाक्यात येणार असल्याचे आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी सांगितले.