पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसल्यास करा हे काम
पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ११ कोटी पात्र शेतकर्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा निधी दिला जात आहे. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी या योजनेचा दहावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांना १०व्या हप्त्याचे दोन हजार रुपये देण्यात आले. मात्र असे असले तरी, देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अजूनही लाभ मिळत नाही.
बिहार राज्यात या योजनेच्या जवळपास एक लाख पात्र शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. आपल्या राज्यातही असे अनेक पात्र शेतकरी आहेत ज्यांना अजून या योजनेचा निधी मिळालेला नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेतील अनेक पात्र शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार कार्ड वरील नावासोबत मॅच होत नसल्याने या योजनेचा निधी मिळत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावात दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात बिहार राज्यातील शेतकऱ्यांना नाव दुरुस्ती करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. राज्य सरकार द्वारे सांगितले गेले की, पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या नावात बदल केला तर त्यांना शिल्लक राशी देण्यात येईल. केंद्र सरकारने २०१९ मध्ये या योजनेला आधार बेस्ट करून टाकले आहे. त्यामुळे या योजनेच्या ॲप्लिकेशन मधील आणि आधार कार्ड वरील नाव मॅच होणे अनिवार्य आहे. नावात थोडीही मिस्टेक असली तरी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. यामुळेच बिहार राज्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. या एवढ्या पात्र शेतकऱ्यांचे आधार वरील नाव एप्लीकेशन वरील नावासोबत मॅच होत नाही.
नावात मिस्टेक असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहेत तर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँकिंग डिटेल चुकीच्या असल्यामुळे या योजनेचा लाभ दिला जात नाहीये. हाती आलेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा प्रविष्ट केला असल्याने त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. बिहार सरकारने या अशा पात्र शेतकर्यांना नावात आणि बँकिंग डिटेल मध्ये सुधारणा करण्यासाठी अवधी दिला होता त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नावात बदल केला आहे, तसेच अनेकांनी आपल्या बँक डिटेल योग्यरीत्या भरले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा आता लाभ दिला जात आहे. असे असले तरी बिहार राज्यात अद्यापही १ लाख १० हजार असे शेतकरी आहेत ज्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाही.
या शेतकऱ्यांना देखील आपल्या नावात तसेच बँक डिटेल मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. जोपर्यंत शेतकरी बांधव आपल्या नावात तसेच बँक डिटेल मध्ये योग्य तो बदल करत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पात्र असूनदेखील या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी आपले नाव व बँक डिटेल योग्य आहे की नाही याबाबत खातरजमा करणे आवश्यक आहे.