मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कोकण हापूस १५०० तर कर्नाटक हापूस १२०० रुपये डझन
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंब्याची आवक वाढू लागल्याने ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. राज्यातील हापूसच्या ४५०० पेट्या तर कर्नाटक राज्यातील ११५० पेटी आंबा बाजारात आला आहे. कोकण हापूस १५०० रुपये डझन तर कर्नाटक हापूस १२०० डझन दराने विकला जात आहे. सध्या हापूस आंब्याबरोबर कर्नाटक आंब्याचे दर येऊ लागले आहेत. तर या दोन आंब्यांमध्ये जास्त काही फरक राहिला नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कोकणातूनच आंब्याची झाडे कर्नाटक राज्यात नेऊन लावण्यात आली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आंबा हळूहळू चांगला रुजला आहे. कर्नाटक राज्यातील माती आणि वातावरणामुळे आंब्याची साल जाड असते. अन्यथा हा आंबा देखील कोकण हापूस सारखा असल्याचे व्यापारी विजय बेंडे यांनी सांगितले. तर सध्या हापूस आंबा किरकोळ बाजारात २५०० ते ३००० रुपये डझन दराने विकला जात आहे.