मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मिरची ८० रुपये किलो तर लिंबू ३ ते ४ रुपये;आवक आणि दर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्यासह लिंबू महाग झाले आहेत. तर भाजीपाला आणि लिंबू तापमान वाढल्याने कसे महाग झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने तापमानामुळे भाजीपाला आणि लिंबू खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबू ३ ते ४ रुपये प्रतिनग विक्री होत आहे. शिवाय मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे उत्पादनात घट झाली आहे.  त्यामुळे सर्वच भाजीपाल्याच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी विक्रेत्यांना होताना दिसत आहे.
शिवाय गेल्या १३ दिवसातील इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हा भाजीपाल्याच्या दरावर झालेला आहे. अनेक भागात केवळ शेतामालाच्या वाहतूकीचा खर्च वाढला आहे. मात्र वाढलेले तापमान आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याचा सर्वाधिक परिणाम मिरची आणि लिंबावर दिसून येत आहे. मुंबई बाजार समिती मधील भाजीपाला मार्केटमध्ये एका लिंबाची किंमत ही चक्क ३ ते ४ रुपयांपर्यंत पोहचलेली  असून  ७५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे
गुजरात, दिल्ली, हैदराबाद, कर्नाटकाच्या तुलेनेत महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर हे नियंत्रणात आहे. शेतकरी ते बाजारपेठेच्या अंतरावरुनही भाजीपाल्याचे दर ठरत आहेत. उत्पादकता कमी-जास्त यावर भाजीपाल्याचे दर वाढले नाहीत तर गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले तापमान आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दर गगणाला भिडले आहेत.
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये  आज  जवळपास ६०० गाडय़ा आवक आहे.  बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, पापडी, वांगी आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाजीपाला घाऊक बाजारात भेंडी ३० ते ३५ रुपये किलो. फ्लॉवर ३० रुपये किलो, कोबी १५ ते २० रुपये किलो, कारली ४० रुपये किलो, वांगी ३० ते ३५ रुपये किलो, शिमला ५० रुपये किलो, वांगी ३० ते ३५ रुपये किलो तर हिरवी मिरची ७० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.