मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कलिंगड ८० गाडी आवक; दर १० ते १२ रुपये प्रतिकिलो

उन्हाचा पारा वाढू लागल्याने शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून पाणीदार फळे खाण्याकडे नागरिकांची कल असतो. तर आता नागरिकांना कलिंगड आणि टरबूज खाण्यास स्वस्त झाले आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये ८० गाडी कलिंगड तर १५ गाडी टरबुजाची आवक झाली आहे. तर आवक वाढल्याने दरात देखील घसरण झाली असून कलिंगड १० ते १२ रुपये प्रतिकिलो तर टरबूज १८ ते २० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
मुंबई APMC मार्केटमध्ये राज्यातील नगर सांगली, सातारा, पंढरपूर, जळगाव आणि पुणे येथून माल येत आहे. तर ग्राहक कमी आणि आवक जास्त झाल्याने दरात घसरण झाली आहे. दर जरी कमी झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र, चांगला दर मिळत असल्याचे व्यापारी हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितले.