राज्याचा कारभार पाहून शेतकऱ्यांनी तेलंगणात घेतल्या जमिनी
महाराष्ट्र राज्यात सतत खंडित होणाऱ्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठामुळे असा परिणाम झाला आहे ज्याचा कोण विचारही करू शकू नाही. यंदा रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने याची झळ खूप झालेली आहे. आतापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने राज्य सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांमध्ये आरोप होत असायचे हे आपल्याला माहीतच आहे. परंतु तेलंगनाच्या अर्थमंत्र्यांनी अशी काय माहिती सांगितली ज्याने लाज वाटेल. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तेलंगणाच्या सीमालगतच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. जे की जमिनीसोबतच बोअरवेल घेऊन ते शेती करत आहेत. तेलंगणा चे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी ही माहिती दिलेली आहे.
आठ तास विद्युत पुरवठा तो ही टप्प्याटप्प्याने :-
पाण्याची साठवणूक केल्यामुळे रब्बी हंगाम जोमात असतो. मात्र यंदा पोषक वातावरण पण मुबलक पाणी नसल्याने टंचाई भासणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पिके बहरत असताना महावितरणकडून कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. यंदा तर दोन टप्यामध्ये ८ तास असा विद्युत पुरवठा असल्याने उत्पादनात घटत आहे आणि शेतकऱ्यांच्या कष्टात वाढ झाली होती. शेतकऱ्यांसाठी राज्यात हिताचे निर्णय घेतले जातात मात्र अंमलबजावणी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती ओढवली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी-विरोधक असमर्थ :-
ज्यावेळी निवडणूक तोंडावर येतात तसेच अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांसाठी फक्त सहानुभूती दाखवली जाते. यंदा राज्य सरकारने जो अर्थसंकल्प जाहीर केला त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून घोषणा करण्यात आल्या मात्र जी मूलभूत गरज असणारा विजेचा प्रश्न आहे तो अजून मार्गी लागलेला नाही. फक्त महाविकास आघाडीच न्हवे तर याआधी जे सरकार होते त्यांनी सुद्धा हा प्रश्न मार्गी लावलेला नाही.
बोअरवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी :-
शेतीला विजेचा पुरवठा व्हावा तसेच पिकांना पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये शेतजमिनी घेतल्या आहेत. ज्या शेतजमिनी घेतल्या आहेत त्यांना बोअरवेल घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. शेती क्षेत्राला फक्त कृषी पंपाचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने तेलंगणा सिमेलगत शेतकऱ्यानी जमिनी घेतल्या आहेत.