मुंबई APMC मसाला मार्किट गड्ढे में, संचालक बिल्डर के अड्डे में!
मुंबई APMC मसाला मार्केट खड्यात, संचालक मात्र बांधकाम व्यवसायिकाच्या अड्ड्यात
मुंबई APMC  मसाला मार्केट संचालक, मार्केटचे व्यापारी आणि असोसिएशनची करतात दिशाभूल!
मंजूर झालेल्या कामावर आक्षेप घेतल्याने संचालकांवर बाजार घटक संतप्त
मुंबई APMC मसाला मार्केटमधील कामे रखडल्याने बाजार घटक हैराण झाले आहेत. मागील फेब्रुवारी महिन्यात मसाला मार्केटकडून २ कोटी २ लाखाचा रेकॉर्ड ब्रेक सेस वसूल झाला आहे. तर एवढा सेस भरून सुद्धा मूलभूत सुविधा मात्र मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. प्रशासकीय काळात कामे न झाल्याने बाजार घटकांनी संचालक निवडून दिल्यावर तरी कामे होतील असा विश्वास व्यक्त केला. मात्र संचालक येऊन दोन वर्ष उलटली तरीसुद्धा अद्याप बाजार घटकांच्या मरणयातना संपत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संचालकांपेक्षा प्रशासक असते तर बरे झाले असते अशी भावना काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  तर मार्केट संचालक व्यापाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे. शिवाय मार्केट संचालक आपल्या वाढदीवसाच्या दिवशी सभापती, बांधकाम समिती अध्यक्ष यांना घेऊन बांधकाम व्यवसायिकाकडे जातात. मात्र मार्केटच्या महत्वाच्या विकास कामांसाठी प्रयत्न करत नाहीत अशी चर्चा बाजार घटक करत आहेत.   मसाला मार्केट संचालक विजय भुत्ता यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सभापती आणि सचिवांकडे बाजार आवारातील कामांची मागणी केली होती. परंतू बाजार समितीने बनवलेल्या कामांच्या अंदाजपत्रकावर त्यांनीच आक्षेप घेऊन काम ठप्प केल्याने बाजार घटक संतापले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी नियमित छोटे-छोटे अपघात घडत असतात. तर सध्या रस्त्याची दुरावस्था पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत वीज पुरवठा करणाऱ्या तारा व पॅसेजच्या स्लॅबची दुरवस्था झाल्याने बाजार घटक चिंता व्यक्त करत आहेत.
जर हि कामे झाली नाहीत तर येणाऱ्या पावसात देखील मसाला मार्केट पुन्हा पाण्यात जाणार अशी खंत व्यक्त केली जात आहे. 
मसाला मार्केट मधील रस्ते डांबरीकरण आणि मलनिःसारण वाहिन्यांच्या कामाच्या दुरुस्तीसाठी २३ जून २०२१ रोजी मार्केट संचालक विजय भुत्ता यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. यावेळी प्रशासनाने नेमणूक केलेले इकोटेक कन्सलटंट प्रा लिमिटेडचे आर्किटेक्चर यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण यासाठी २ कोटी ७ लाख तर मलनिःसारण (ड्रेनेज लाइन) दुरुस्तीसाठी २ कोटी ५२ लाख असे एकूण ४ करोड ५९ लाख इतके अंदाजपत्रक दिले. यावर २ डिसेंबर २०२१ रोजी असलेल्या बोर्ड मीटिंगमध्ये संचालक विजय भुत्ता यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे हे काम गेली चार महिन्यांपासून रखडले आहे. जर आता हे काम झाले नाही तर थेट पुढील वर्षी काम जाईल आणि पुन्हा समस्या जैसे थे राहतील अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.
तर अवाक आणि जावक अशा सर्व प्रवेशद्वारांवर मोठमोठे खड्डे असल्याने नक्की हे मार्केट आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठेतीलच आहे का ? असा सवाल विचारला जात आहे.
मंजुरी मिळून सुद्धा काम होत नाही ते बरोबर नाही. संचालकांनी कामातील गैरवव्यवहाराबाबत पुराव्यासह प्रशासनाकडे गेले पाहिजे. मात्र सुरु होणारे काम थांबवणे योग्य नाही. चुकीचा कामावर कारवाई झाली पाहिजे. जर हे काम आता झाले नाही तर पुढील वर्षी काम जाणार त्यामुळे मसाला मार्केट बाजार घटकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तर मंजूर झालेले काम विना अडथळा झाले पाहिजे. दिपकभाई शहा 'अध्यक्ष गुळ असोसिएशन'
मार्केटच्या सर्व असोसिएशनच्या लोकांना सभापती आणि सचिव यांच्याकडे घेऊन जाऊन मार्केटच्या विकास कामांची मागणी करतात. मात्र नंतर त्याच कामावर आक्षेप घेतात हे चुकिचे आहे. त्यामुळे आमच्या लोकांची सुद्धा मार्केट संचालक दिशाभूल करतात असे दिसत आहे. अशोक जैन अध्यक्ष 'शुगर मर्चंट असोसिएशन'