मुंबई APMC मसाला मार्केटची रेकॉर्ड ब्रेक सेस वसुली; धान्य मार्केट दुसरे तर फळ मार्केटचा सेस कोसळला
गेली काही दिवसांपासून मुंबई बाजार समितीच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचारी पगारवाढ आणि मार्केटची अनेक विकास कामे रखडली होती.   अशात प्रत्येक मार्केटकडून पुरेसा सेस वसूल करण्याचा प्रयत्न बाजार समितीने सुरु केला होता. तर याबाबत आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक उपसभापती धनंजय वाडकर यांनी पाचही मार्केटच्या उपसचिव आणि दक्षता पथकाला मार्केटचे उत्पन्न वाढवण्यासाठी सेस वसुलीचे टार्गेट दिले होते. यावर मसाला व धान्य मार्केटने रेकॉर्ड ब्रेक वसुली केली आहे. तर फळ मार्केटचा सेस सर्वात कमी जमा झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात २ कोटी ५ लाख एवढा सेस जमा झाला असून हि रेकार्ड ब्रेक सेस वसुली असल्याचे सांगण्यात येत आहे. मसाला मार्केट नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यापासून पहिल्यांदा एवढा सेस मसाला मार्केटमधून जमा झाला आहे. त्यामुळे एवढा सेस भरून मसाला मार्केट सेस भरणाऱ्या मार्केटमधून पहिल्या स्थानावर आहे. तर २ कोटी २ लाख एवढा सेस भरून धान्य मार्केट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ मार्केट अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर गेले आहे.
भाजीपाला मार्केट मधून ८७ लाख ४२ हजार, कांदा-बटाटा मार्केट मधून ६१ लाख ५० हजार तर फळ मार्केट मधून ४७ लाख ४५ हजार रुपये सेस वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्केटमधून पुरेसा सेस जमा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.