मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा व्यापार होत असल्याचे उघड; शेतकऱ्याच्या नावे देण्यात आलेली पट्टी एपीएमसी न्यूजच्या हाती
मुंबई APMC दक्षता विभागाने मार्केटबाहेरील अनधिकृत व्यापारावर कारवाई करण्यासाठी यादी तयार केली आहे. मात्र बाजार समितीच्या भाजीपाला   मार्केटमध्ये कांदा-बटाटा, लसूण, नारळ, चिनी भाज्या, द्राक्ष इत्यादी होत असलेल्या अनधिकृत व्यापाराची यादी तयार होऊन सुद्धा कारवाई केली जात नसल्याने प्रभारी सचिव एक्शनमोड मध्ये आले आहेत. त्यामुळे सचिव संदिप देशमुख यांनी भाजीपाला मार्केट उपसचिवांना हा अनधिकृत व्यापार त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कारवाई नक्की होणार का? फक्त दिखावा असणार असा सवाल बाजार घटक करत आहेत.
मुंबई APMC मार्केट बाहेरील अनधिकृत व्यापार रोखण्यासाठी बाजार समिती बैठकांवर बैठका घेत आहे. तसेच आमदार शशिकांत शिंदे याच्या पुढाकाराने मंत्रायलयात गृहमंत्री व सहकार मंत्री यांच्या सॊबत अनधिकृत व्यापार थांबवण्यासाठी बैठक झाली होती. त्यावर एक महिना होऊन सुद्धा येथील अनधिकृत व्यापार बंद होण्याऐवजी जोमात सुरु असल्याचे समोर आले आहे. जर भाजीपाला मार्केटमध्ये फळ आणि कांदा विकला जात असेल तर फळ आणि कांदा-बटाटा मार्केट कशासाठी असा सवाल बाजार घटक करत आहेत. शिवाय बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात सेस देखील बुडवला जात आहे.
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील इ-६८४ या गाळ्यावर व्यापारी अक्षय शिंदे यांनी २११५ किलो शेकऱ्यांकडून कांदा मागवला होता. याबाबत त्यांना लेखी पट्टी देखील देण्यात आल्याने भाजीपाला बाजारात कांदा-बटाटा व्यापार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र सप्लायच्या नावाखाली कांदा,बटाटा लसणाचा या ठिकाणी साठा करण्यात येतो असे व्यापारी सांगत होते. परंतू सॅम्पलिंग आणि किरकोळ पद्धतीने इ, ए व डि पाकळी मध्ये कांदा, बटाटा आणि लसणाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. परंतू या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई बाजार समिती प्रशासनाने केली नाही. तर या ठिकाणी केवळ सप्लायसाठी हा माल येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता थेट कांदा शेतकऱ्याच्या नावाने भाजीपाला मार्केटमधून पट्टी देण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये जे लोक कांदा-बटाटा व्यापार करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सचिव संदिप देशमुख यांनी सांगितले.