मुंबई APMC लवकरच येणार INCOME TAX आणि ED च्या रडारवर!
किरीट सोमय्यांच्या 'मिशिन नवी मुंबई'ला सुरुवात पडद्यामागील हालचालींना वेग
रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना किरीट सोमय्या यांनी नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी नवी मुंबई महापालिका आणि बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टचार बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. यावर नवी मुंबई मनपा आणि मुंबई बाजार समिती मध्ये देखील कोणी यशवंत जाधव असेल तर त्याला बाहेर काढू असा थेट इशाराच सोमय्यानी दिला होता. त्यामुळे या धर्तीवर काही लोक महापालिकेच्या तर काही बाजार समितीच्या गैरप्रकारांची यादी करू लागले आहेत.
मुंबई बाजार समितीमधील ६५ कोटी मुदत ठेव, भाजीपाला बाजारातील बोगस कोड, एफएसआय घोटाळा आणि विविध पडून असलेले प्रकल्प व त्याला लागलेला वाढीव खर्च याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बाजार समितीचे काही अधिक भ्रष्ट विभाग प्रथम टार्गेट केले जाणार असल्याचे कळते. त्यामुळे बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि काही व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर 'अति तेथे माती' म्हणीप्रमाणे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याने हि वेळ आल्याची चर्चा बाजार घटक करत आहेत.  जर हाती आलेल्या कागदपत्रांमध्ये तथ्य आढळून आल्यास मुंबई बाजार समिती INCOME TAX आणि   ED च्या रडारवर असणार आहे.