कुठलीही कर वाढ न करता नवी मुंबई महापालिकेचा ४९१० कोटींचा अर्थसंकल्प सादर; वाचा एका क्लीकवर
नवी मुंबई महानगर पालिकेचे २०२२- २३ साठी तब्बल ४९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीही कोणतीच करवाढ करण्यात आलेली नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प नागरिककेंद्री असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपा मुख्यालयात अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे अर्थकारणाची गती मंदावली आहे. नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. यामुळे यावर्षीही कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. शहराच्या सर्वांगीन विकास लक्षात घेऊन विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कोरोनामुळे आरोग्य सेवांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे. यामुळे अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी तब्बल 224 कोटी 81 लाख रुपयांची तरतूद केली आहे.आरोग्य विभागाचे सक्षमीकरण केले जाणार आहे. नागरी सुविधांसाठी 1472 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. घणसोली ते ऐरोली खाडीवर पूल बांधला जाणार आहे. पामबीच रोड व ठाणे बेलापूर मार्गावर उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. नेरूळमध्ये सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात पर्यावरण रक्षणार्थ ही भर दिला आहे. पर्यावरणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे. शहरात तरणतलाव क्रीडासंकुल तयार केले जाणार आहे. शहरात सर्वत्र एलईडी लाईट बसविल्या जाणार आहेत. प्रत्येक विभागात विद्युत व गॅसदाहिनी तयार केली जाणार आहे. मोरबे धरणावर सौरउर्जा प्रकल्प तयार केला जाणार आहे..
2022-23 उत्पन्नाची बाजू(रूपये लाखात)
स्थानिक संस्था कर- 150295.57
मालमत्ता कर- 80447.96
विकास शुल्क- 31058.91
पाणी पट्टी- 9161.89
परवाना व जाहिरात शुल्क- 1506.92
अतिक्रमण शुल्क- 377
मोरबे धरण व मलनिसःरण- 4148.60
रस्ते खोदाई शुल्क- 2720
आरोग्य सेवा शुल्क- 1292.09
शासन पुरस्कृत योजना- 46507.32
संकीर्ण जमा- 28048.40
आरंभिची शिल्लक- 135435.34
एकूण- 491000.00
खर्चाचे नियोजन
नागरी सुविधा- 147259.09
प्रशासकीय सेवा- 75084.80
पाणी पुरवठा व मलनिसःरण- 56833.76
उद्यान व मालमत्ता- 57553.08
ई गव्हर्नस 18×09.12
सामाजिक विकास- 5937.41
स्वच्छ महाराष्ट्र, घनकचरा व्यवस्थापन, क्षेपनभूमी- 39781.37
शासकीय योजना- 1293
आरोग्य सेवा-22481.79
परिवहन- 16101
आपत्ती निवारण, अग्निशमन- 11807.76
शासकीय कर परतावा- 14290
शिक्षण- 15958.82
कर्ज परतावा- 7177
अतिक्रमण- 1052
एकूण- 490820