रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या मागणीत वाढ; द्राक्षाला मात्र फटका
रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतात देखील परिणाम झाला आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे हि दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रतिकिलो ४ ते ५ रुपये अधिक दराने गहू खरेदी करावा लागणार आहे. मात्र द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून १५ ते २० टक्के कमी निर्यात होत आहे. विशेष करून द्राक्षांची जास्त मागणी युरोप देशात १० हजार कंटेनर निर्यात होतात. तर रशिया आणि युक्रेन मध्ये जात निर्यात होते. त्यामुळे द्राक्ष निर्यात अडचणीत आली आहे. तर या दोन देशांमध्ये गव्हाचे देखील उत्पादन अधिक होते. तर जवळपास संपूर्ण जगाला गहू पुरवण्याचे काम या देशातून केले जाते. या रशिया आणि युक्रेन मधील समुद्र परिसरात चांगला प्रतीचा गहू होता. येथून संपूर्ण जगात ९० लाख टन गहू निर्यात होते. युद्धामुळे येथून निर्यात होत नाही. त्याचा फायदा भारताला मिळत असून सध्या देशातून १ करोड १० लाख टन अंदाजे गहू निर्यातीचे लक्ष आहे. यापूर्वी केंद्र सरकार ७० लाख टन गहू निर्यात करत होते. त्यामुळे गव्हाची निर्यात वाढली असल्याची माहिती फ्रेंडशिप ब्रोकरचे देवेंद्र बोरा यांनी दिली.