साखर कारखाने- शत्रू नव्हे मित्र
शेतमालाच्या एकूण 229 प्रकारांपैकी (कोथिंबीर, दुधा पासून ते धान, कापुस पर्यंत) फक्त उस हेच एकमेव पिक आहे ज्याला रडतखडत, कधी विलंबाने का होईना, हमीभावाची खात्री आहे.
बाकी इतर पिकांसाठी अडानी- अंबानीच्या बिझिनेस पेक्षा जास्त शेतकरी रिस्क / जोखीम घेत असतो.
शेतकरी आपल्या न्याय मागण्या मांडून संघर्ष करताना साखर कारखाने म्हणजे शत्रू असल्यासारखे वागत असतो. त्या मागण्या पुर्ण होणे आवश्यकच आहेत. तसेच कारखान्यातील भ्रष्टाचार संपला पाहीजे.
परंतु हे ही लक्षात घेतले पाहीजे की साखर उद्योगामुळे ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, रोजगार निर्मिती झाली आहे, शेतकऱ्यांना
कारखानदार बनवले आहे.
शेतकरी भावांनो, साखर कारखाने हे आपले शत्रू नव्हे मित्र आहेत.
साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्व स्टेक होल्डरस म्हणजे उत्पादक, सभासद, व्यवस्थापक, उस तोड कामगार, ग्रामस्थ, तज्ञ ह्यांच्या मध्ये वैचारिक सेतु बांधायचा हा छोटा प्रयत्न.
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518