भाजीपाल्याला मातीमोल भाव; शेतकरी हवालदिल
कळमेश्वर भाजी बाजारात सांबार, फुलकोबी, वांगे, टमाटर यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने या भाजीपाल्याचे दर कमी झालेत. हिरवाकंच सांबार फक्त दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. शेतातून तोडून तो बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडत नाहीए. त्यामुळं असा भाजीपाला न तोडता तो जनावरांना चारा म्हणून खाऊ घातला जातो आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कपासी या पिकांना मोठा फटका बसला. उत्पादनात घट झाली. सोयाबीन व कपासीला भाव वाढ मिळाली. त्यामुळं थोडासा दिलासा मिळाला होता. पण, आता भाजीपाल्याच्या पडत्या भावाने भाजीपालात उत्पादक पुन्हा हवालदिल झालाय.
यंदा पावसाळयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. विहिरी व तलावामध्ये मोठा जलसाठा उपलब्ध झालाय. त्यामुळं शेतकरी भाजीपाला पीकलागवडीकडं वळलेत. वांगी, फुलकोबी, टमाटर, मेथी, भाजी, पालक, सांबार, वालाच्या शेंगा, चवळी भाजी यांची लागवड करण्यात आली. त्यामुळं उत्पादन जास्त झाले. म्हणून भाव पडलेत.
नागपूर जिल्ह्यात कळमेश्वरचा भाजीबाजार प्रसिद्ध आहे. शेतकरी या बाजारात थेट भाजीपाला विक्रीसाठी आणतात. आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. सांबार, फुलगोबी, पालक, मेथी,टमाटरची मातीमोल भावात विक्री सुरू आहे. लागवड खर्चही निघत नाहीए. या परिस्थितीमुळं भाजीपाला उत्पादक हवालदिल झाला आहे. नागपूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. त्यामुळं बाजाराच येणारी भाजीपाल्याची आवक जास्त झाली. त्या तुलनेत विक्री होत नाही. त्यामुळं पडत्या भावात भाजीपाला विकावा लागत आहे. भाजीपाला तोडून विक्री करणेही आता शेतकऱ्यांना पडरवण्याजोगे राहिले नाही. भाजीपाला जनावरांना चारावा लागतो.
सांभार 10 रुपये किलो, वांगी 20 रुपये किलो, टमाटर 10 रुपये किलो, फुलकोबी 10 ते 15 रुपये फुल, मेथी, गाजर 30 रुपये किलो, कांदा 30 रुपये किलो, बटाटे 20 रुपये किलो प्रतिकिलो