इस्कॉन मंदिर चोरी प्रकरणी दोन बांगलादेशी ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणाऱ्या बांगलादेशीना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपीकडून ८० हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबई खारघर येथील इस्कॉन मंदीरातील तीन दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरी करून सराईत पळून गेले होते. मध्यवर्ती गुन्हे शाखा तर्फे या आरोपीना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. यात राजू फरहात शेख व अमीरूल उर्फ आकाश मन्नन खान यांना ताब्यात घेण्यात आले.
या आरोपींनी मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, ठाणे या परिसरात मंदिरातील दान पेट्यांवर डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले. तर हे दोन्ही आरोपी बांगलादेशी असून सुद्धा या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून रहात होते.
आयुक्त बिपीन कुमार सिंग, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे महेश घुर्ये, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयसिंह भोसले व सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपस करण्यात आला. आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.