मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दोन भाव; प्रशासनाचा अजब-गजब कारभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात नियमित बदल पाह्यला मिळतात. सध्या भाजीपाला बाजारात आवक जास्त आणि ग्राहक कमी असल्याने पालेभाजी दरात घसरण पाहायला मिळाली. आज भाजीपाला मार्केटमध्ये ४५० गाडी आवक झाली असून त्यात ६५ गाडी पालेभाजी आली आहे. या मध्ये   कोथिंबीर १ लाख ६३ हजार १०० क्विंटल आली असून २ ते ५   रुपये प्रति जुडी दर आहे. मेथी ५२ हजार ६०० क्विंटल आवक असून ५ रुपये प्रति जुडी विकली जात आहे. पालक १ लाख ५५ हजर ९०० क्विंटल आवक झाली असून २ ते ६ रुपये प्रतिजुडी विक्री होत आहे. तर शेपूची अवाक   ८ हजार क्विंटल झाली असून ५ ते ६ रुपये प्रति जुडी विकले जात आहे.
माल जास्त आणि ग्राहकांअभावी हे दर घसरले आहेत. मात्र बाजारातील दर आणि बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आलेले दर यात तफावत पाहायला मिळाली. कोथींबीर १२ ते १४, मेथी १२ ते १४, पालक ७ ते ८ तर शेपू १२ ते १६ रुपये असल्याचे बाजारभाव दिले आहे. त्यामुळे अशाप्रकारे बाजारभाव देऊन प्रशासन काय सिद्ध करत आहे असा सवाल विचारला जात आहे. तर नक्की या बाजारभावाचा काय घोटाळा आहे अशी विचारणा बाजार घटक करत आहेत.