आंब्याला अवकाळी पावसाचा फटका; मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आवक
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आंबा आवक कमी झाली असून रत्नागिरी आणि कर्नाटक राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. फळ मार्केटमधील H पाकळीत कर्नाटक आंब्याचा मोठा व्यापार होतो. आज जवळपास ५००० पेटी कर्नाटक आंबा तर २०००० पेटी हापूस आंबा बाजारात येत आहे. अवकाळी पावसामुळे यंदा कोकण हापूस आवक सुद्धा कमी असून आंबा दरात वाढ झाली आहे. शिवाय अशा परिस्थिती देखील कोकण हापूस नावाने कर्नाटक आंबा विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटक हापूस क्रेटमध्ये किलोच्या दराने विकला जात आहे. सध्या हापूस आंब्याबरोबर कर्नाटक आंब्याची आवक कमी होऊन दर वाढले आहेत. तर या दोन आंब्यांमध्ये जास्त काही फरक राहिला नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. कोकणातूनच आंब्याची झाडे कर्नाटक राज्यात नेऊन लावण्यात आली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आंबा हळूहळू चांगला रुजला आहे. सध्या कर्नाटक आंबा ३०० ते ८०० रुपये प्रति डझन तर हापूस आंबा १००० ते १५०० प्रति डझन विकला जात आहे.