water-bursting-from-the-canal-huge-loss-to-the-farmer
मातीच्या भरावाला भगदाड जायकवाडी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या या कॅनॉलचा भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने भरावाच्या माध्यमातून पाण्याची वहिवाट तर झाली पण दरम्यानच, भराव हा मातीचा असलाने वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या शेतावजवळच मातीचा भराव हा फुटला. भरावाचे पाणी थेच नवले यांच्या शेतामध्ये घुसले
पाण्याचाही अपव्यय : कॅनॉल फुटल्याने केवळ शेती पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली नाही तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यवही झाला आहे. अखेर संबंधित शेतकऱ्यांनी याची माहिती जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यालयास दिली आहे.
शेतकऱ्यांचे प्रयत्न : सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्या आहेत. आता तर कॅनॉलचे पाणी शेतामध्ये घुसले तर पिकांचे नुकसान होणार. यामुळे शेतकरी जयराम नवले यांच्यासह शेजारच्या शेतकऱ्यांनी पाणी वावरात येऊ नये शर्थीचे प्रयत्न केले. मात्र थोड्याबहुत प्रमाणात पाणी आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
कडब्याच्या पेंड्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न : मातीच्या भरावाला भगदाड पडल्याने भरावातील पाणी थेट शेतामध्ये घूसु लागले होते. म्हणून शेतकरी मिळेल त्याने पाणी अडवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान काही शेतकऱ्यांनी तर कडब्याच्या पेंड्या आडव्या लावून पाणी थोपवण्याचा प्रयत्न केला होता.