गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ
मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे हि दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रतिकिलो ४ ते ५ रुपये अधिक दराने गहू खरेदी करावा लागणार आहे. या दरवाढीचा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. सध्या मध्यप्रदेश ६५%, गुजरात२५% आणि राजस्थान मधून १०% गहू बाजारात येत आहे. त्यात गव्हाची निर्यात सुरु झाल्याने दरवाढ झाली असून याचा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळत आहे. मात्र ग्राहकांना आता गहू अधिक दराने घ्यावा लागणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेलापाठोपाठ गव्हाची दरवाढ झाली आहे. तर युद्धामुळे आणखी कोणत्या वस्तूंची दरवाढ होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.