स्ट्रॉबेरीबाबत ग्राहकांची फसवणूक टाळणार; काय आहे फॉर्मुला वाचा सविस्तर
आता फक्त महाबळेश्वर मध्येच स्ट्रॉबेरी चे उत्पादन नाही तर आता काळाच्या ओघानुसार विविध प्रदेशात सुद्धा उत्पादन घेतले जात आहे. विविध प्रदेश म्हणजे मराठवाडा विभागातील डोंगराळ भागात सुद्धा स्ट्रॉबेरी ची लागवड केली जात आहे. परंतु अजूनही महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरीची चव न्यारीच असल्यामुळे ग्राहकांकडून जास्तीत जास्त मागणी आहे. बाजारामध्ये विविध प्रदेशातील स्ट्रॉबेरी दाखल होत असल्याने लोकांना समजत नाही. जे की यावर कृषी पणन मंडळ कोल्हापूर व प्रक्रिया सहाकरी संस्थेने एक उपाय काढलेला आहे. जो की महाबळेश्वर मध्ये जी स्ट्रॉबेरी पिकते त्या बॉक्सवर क्यूआर कोड असणार आहे. त्यामुळे आता ग्राहक फसणार नाहीत. या उपक्रमामध्ये १० शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून भविष्यात याची संख्या वाढणार आहे.
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ओळखण्यासाठी आता वेगळ्या प्रणाली चा उपयोग होणार आहे. क्यूआर कोड मुळे आता आपणास ही स्ट्रॉबेरी कुठे पिकते, शेतकऱ्याचे नाव काय आहे. तसेच त्यामध्ये असणारे न्यूट्रीशन व्हॅल्यू, स्ट्ऱॉबेरीची तोडणी आणि बॉक्स पॅकिंग पद्धत तसेच सेंद्रिय पद्धतीची स्ट्रॉबेरी असेल तर प्रमाणपत्र सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता बाजारपेठेत महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी कोणती आहे ते लगेच समजणार आहे.
विविध भागांतील शेतकरी स्ट्रॉबेरी ची लागवड करत आहेत जे की यासाठी पोषक वातावरण तयार करून उत्पादन घेतले जात आहे. जरी असे होत असले तरी महाबळेश्वर मध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरी चे उत्पादन निघते आहे. महाबळेश्वर मध्ये थंड वातावरण असल्याने स्ट्रॉबेरी ला चव आहे. स्ट्रॉबेरी चे आयुष्य वाढावे यासाठी विविध प्रयोग ही केले जात आहेत तसेच प्रीकुलिंग यंत्रणा, रिपर व्हॅन सारख्या प्रणाली वापरून महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी बाहेरच्या देशात पाठवली जात आहे.
थंड भागातील स्ट्रॉबेरी ची चव न्यारी असल्यामुळे आजही बाजारपेठेत महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी ला मोठी मागणी आहे. अधिक प्रमाणत पैसे खर्च करून शेतकरी उत्पादन घेत आहेत पण बाजारपेठेत महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी च्या नावाखाली कोणत्याही भागातील स्ट्रॉबेरी विकली जात आहे आणि या कारणामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक होऊ नये म्हणून आता कृषी पणन मंडळ कोल्हापूर व श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्थेने ही नवीन प्रणाली सुरू केली आहे जे की आतापर्यंत या उपक्रमात १० शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.