आता बनणार हिरवी मिरची पावडर; शेतकऱ्यांच्या बांधावरून होणार मिरचीची खरेदी
आतापर्यंत आपण लाल मिरची पावडर म्हणजे चटणी ऐकली आहे. बरेच शेतकरी आणि मिरचीवर प्रक्रिया करणारे उद्योग लाल मिरची पासून पावडर बनवून ते बाजार विकत होते. परंतु आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर आहे. कारण आता शेतकरी हिरव्या मिरची पासून देखील पावडर तयार करू शकणार आहेत. यासाठी वाराणसी येथील भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था अर्थात आयआयव्हीआर ने हिरवी मिरची पासून पावडर तयार करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील कंपनीसोबत करार केला आहे.
हिरव्या मिरची पासून पावडर तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतलेली आय आय व्ही आर हिमाचल प्रदेश येथील मेसेर्स होलटेन किंग कंपनी सोबत शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच हिरव्या मिरचीची पावडर तयार करणार आहे. या संस्थेचे निर्देशक डॉ. तुषार कांती बेहेरा यांनी सांगितले की, हिरव्या मिरचीची पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे व या तंत्रज्ञानाचे पेटंट आय आय व्ही आर च्या नावे आहे.
जर आपण पाहिले तर सध्य परिस्थितीत बाजारामध्ये लाल मिरची पावडर उपलब्ध आहे. परंतु बाजारात हिरव्या मिरचीची पावडर कुठेही मिळत नाही. या संस्थेने खासच तंत्रज्ञानाने तयार केलेल्या हिरव्या मिरचीच्या पावडर मध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त विटामिन सी, 94 ते 95 टक्के क्लोरोफिल आणि 65 ते 70 टक्के कॅप्ससीन आहे. या हिरव्या मिरचीच्या पावडर चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अगदी सामान्य तापमानात बऱ्याच महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवू शकतात. याबाबतीत संस्थेचे डॉ. तुषार कांती बेहेरा यांनी सांगितले की, हिरव्या मिरचीची पावडर तयार करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलवर कंपनीने करार केला आहे.
हिरवी मिरची तयार करण्यासाठी ही कंपनी थेट शेतकऱ्यांकडून त्याच्या बांधावर जाऊन हिरव्या मिरचीची खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वाचेल आणि मिरचीची मागणी वाढल्यामुळे उत्पन्नदेखील हातात जास्त येईल. तसेच बाजारपेठेला एक चांगला पर्याय निर्माण होईल.