कांद्याला भाव मिळावा तसेच कांद्याचे रोखे त्वरित द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
 
धुळे :   कांद्याला भाव मिळावा तसेच कांद्याचे रोखे त्वरित आदर केले जावे या मागणीसाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांनी आज सकाळच्या सुमारास काही काळ रस्ता रोको आंदोलन केले यामुळे बाजार समिती समोरील रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंब झाला होता. पोलिसांनी त्वरित या ठिकाणी शेतकऱ्यांचशी संवाद साधत शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींशी चर्चा करावी असे सांगत त्यांना रस्त्यावरून बाजूला केले. त्यामुळे काही काळ खोळंबलेली वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत सुरु झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समितीच्या रस्त्यावरून कांद्याला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे त्वरित अदा करा अशा घोषणा देत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयाकडे चर्चेसाठी मोर्चा नेला. काही निवडक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार आम्हाला कांद्याला भाव कमी मिळत आहे अनेक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये कांद्याला भाव मिळत असून आम्हाला मात्र तीन हजार रुपये भाव मिळत आहे शेतकऱ्यांचा कांदा योग्य भावाने खरेदी करावा तसेच खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांकडून तात्काळ जागेवरच मिळावे पंधरा दिवसानंतर केले जात असणारे पेमेंट शेतकऱ्यांना न परवडणारे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवरच पैसे द्यावे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कांद्या सोबतच म्हणणेदेखील ऐकून घेत त्यांना योग्य रीतीने भाव मिळावा अशा मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आल्या या सर्व मागण्यांचा आम्ही योग्य पद्धतीने विचार करीत शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव देऊ तसेच व्यापारी वर्गाचे म्हणणे ऐकून घेत जागेवरच शेतकऱ्यांना पैसे देण्याचे व्यापारी वर्गाला देखील सांगण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना सभापतींकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलन मागे घेतले त्यानंतर काही वेळानंतर सुमारे पावणेतीन वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचा लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाला.
तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश विनायक पाटील यांनी दालाना बाहेर येत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले चर्चा अंती मार्ग निघेल असे आश्वासन दिले.