वाढत्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान
 
वाढत्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान
जळगाव: जळगाव मधील रावेर येथे   गेल्या तीन दिवसांपासून रावेर आणि परिसरातील तापमानाने ४४ अंशांचा   आकडा गाठला आहे. त्यामुळे केळीचे मोठे नुकसान होत आहे. सुरुवातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळी पीकाला आडवे केले. आता पारा ४४ अंशांवर गेल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तापमान सहनही होईना आणि सांगताही येईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस   झाला आहे, त्याचबरोबर अजून देखील सुरु आहे. त्यामुळे राज्यातील हवामान सारखा बदल होतं आहे. तालुक्यातील सावखेडा बु., सावखेडा खुर्द, रोझोदा, खिरोदा, लोहारा, चिंचाटी, जानोरी, गौरखेडा शिवारातील गारपीट व अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे अद्याप पुर्ण केलेले नाहीत, तोच सतत तीन दिवस सूर्य आग ओकू लागल्याने तब्बल ४४ ते ४५ सेल्सिअस तापमानाच्या भट्टीत या केळी बागांची कमालीची होरपळ होत आहे. नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.४२ अंशांपेक्षा जास्त सतत तीन दिवसांचे तापमान केळी बागांकरिता घातक मानले जाते. सकाळीपासून कडक उन्हं असल्यामुळे, मनवेल ता. यावल परिसरातील केळी बागा उन्हामुळे करपू लागल्या आहेत. त्यामुळे आता केळी उत्पादन नेमकं काय करावं अशा विचारात आहेत. किती होते, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील सुमारे २२ हजार हेक्टरवरील केळी बागांना असा उष्णतेच्या सूर्य प्रकोपात केळी उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण तरी कोण देणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, उष्णतेचा प्रकोप म्हणून नैसर्गिक आपत्ती पाहता केंद्र व राज्य सरकारनेही केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.