शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या
 
Pune News: कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे   जुन्नर येथील शेतकरी संजय टेकुडे यांनी दोन एकर कांद्याच्या शेतात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठया प्रमाणात कांदा लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक अर्थसंकटात सापडला आहे. सध्या कांद्याला किलोला फक्त १५ ते २५ रुपये बाजारभाव मिळत आहे.
परंतु वातावरणात नेहमी होणारे बदल यामुळे वेळोवेळी करावी लागत असलेली औषधे फवारणी, खतांचे वाढलेल्या किमती यासाठी मोठा खर्च येत असून सध्या मिळत असलेल्या भावात खर्च देखील फिटत नाही.
दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी शुक्रवारी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस एक नंबर कांद्यास २४१ ते २७१ बाजारभाव मिळाला.दोन नंबर कांद्यास २०० ते २४१ रुपये बाजारभाव मिळला.