Tomato Trouble : टोमॅटोच्या दरवाढीने महागाईला फुटला घाम, अर्थतज्ज्ञ म्हणतात हा उपाय कराच
 
टोमॅटोच नाही तर इतर पण भाजीपालाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
महागाईचा विस्फोट झाल्याने अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेला हा उपाय करण्याचे साकडे घातले आहे.
Tomato Trouble :देशात महागाईला (Inflation) पालेभाज्यांनी घाम फोडला आहे. भाजीपाला महागल्याने महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे. यापूर्वीच्या महिन्यात हा निर्देशांक खाली आला होता. ग्राहक किंमत निर्देशांकाने (Consumer Price Index-CPI) पण भरारी घेतली आहे. टोमॅटोच नाही तर अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची आणि इतर भाज्या महागल्या आहेत. महागाईचा विस्फोट झाला आहे. आरबीआयने दोन वेळा रेपो दरात (RBI Repo Rate) कुठलाच बदल केलेला नाही. तो कमी केला नाही पण वाढवला ही नाही. तसा हा ग्राहकांना दिलासा नाही. कारण त्यांना आजही ईएमआयवर वाढीव व्याज भरावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाय सुचवला आहे. काय दिला त्यांनी सल्ला?
आरबीआयच्या पतधोरण समितीची (RBI MPC Meeting ) ऑगस्ट महिन्यात बैठक होत आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 10 ऑगस्ट 2023 रोजी बैठक होईल. त्यात रेपो दराचा निर्णय होईल. जर या समितीने सध्याचा रेपो रेट कायम ठेवला तरी कर्जदारांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यांच्या ईएमआयमध्ये कपात न झाल्याने दिलासा मिळणार नाही.
रेपो दर सूसाट
व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.
अर्थतज्ज्ञांचा अंदाज काय
देशातील पतधोरण निश्चित करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, आरबीआय रेपो दरात कपात करण्याची स्थिती नाही. फूड बिलमध्ये वाढ झाली आहे. दाळी आणि भाजीपाला महागला आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत महागाईचा आकडा फुगण्याची शक्यता आहे. टोमॅटो, अद्रक, भोपळा, हिरवी मिरची, बटाट यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा हा फटका आहे. ही महागाई अस्थायी स्वरुपाची असल्याचा अर्थतज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे रेपो दरात लागलीच मोठ्या बदलाची शक्यता कमी आहे.
अर्थतज्ज्ञांचा सल्ला काय
महागाई निर्देशांकाची धावपळ पाहता, आरबीआय रेपो दरात कपात करणार नाही असा अर्थतज्ज्ञांना वाटते. केअरएजच्या मुख्य अर्थशास्त्री रजनी सिन्हा यांच्या मते रेपो दरात कपात होणार नाही. व्याजदरात पुढील वर्षात कपात होऊ शकते. अनेक अर्थतज्ज्ञांनी रेपो दरात वाढ न करता तो कायम ठेवण्याचा उपाय सुचवला आहे.