शेतजमिनीच्या कामासाठी मागितले 41 लाख लाच घेताना रंगेहात अटक डेप्युटी कलेक्टर ACB च्या जाळ्यात

राज्यात गेल्या काही दिवसांत एसीबीच्या (ACB) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला वेग आला असून विविध जिल्ह्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी जाळ्यात अडकत आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क निवासी उपजिल्हाधिकारी आणि त्याच्या स्विय सहाय्यक अटक करण्यात आली आहे. लाच घेताना एसीबीने त्यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या कामासाठी लाच स्वीकारण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतजमिनीच्या वर्ग 2 ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाकाकडून 23 लाख रुपये आधीच घेतले होते. मात्र त्यानंतर पुन्हा 18 लाखांची मागणी केली. त्यातीस पाच लाख रुपये स्विकारताना अटक करण्यात आली आहे.
एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीचा वर्ग बदलण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. या अगोदर त्यांनी 23 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यानंतर काम अवघड असून अजून पैशाची आवश्यकता असल्याचे सांगत आणखी १८ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पाच लाख रुपये स्विकारताना एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही अधिकारी, कर्मचारी सामान्यांची नियमात असणारी कामे अडवतात. त्यांच्याकडून अगदी 100 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत लाचेची मागणी करतात परंतु काही सुजाण नागरिक या लाचखोर लोकसेवकांची 'एसीबी'कडे तक्रार करतात. येथील पथक सर्व शहानिशा करते. त्यानंतर मग पडताळणी करून सापळा लावतात आणि लाच घेताच त्याला पकडतात.गेल्या काही दिवसात 'एसीबी'ने कारवाया करून मासे गळाला लावले आहेत. शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याची प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत.