Kartule | चिकन ,अंडी ,मटण पेक्षा सर्वात ताकदवान भाजी - औषधी गुणधर्माने भरपूर रानमेवा
Mumbai APMC :पावसाळ्यात माळरानावर उगवणारी   करटुली ही सर्वात ताकदवान भाजी  
पोषण मुल्यांनी भरपूर असल्याने बाजारात या भाजीला चांगला दर 
मुंबई apmc भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये करटुलीचाभाव २५०रु प्रतिकिलो
करटुलीची घरगुती पद्धतीने लागवड करून मिळवा पोषक तत्वांचा लाभ
पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या शेतात उगवत असतात. लोक या भाज्या आवडीने खात देखील असतात.   यापैकीच शेताच्या बांधावर किंवा माळरानावर उगवणारी   करटुली ही रान भाजी.   बरचशे शेतकरी गावरान करटुलीच्या बियापासून लागवड करून उत्पादन घेत असतात. पोषण मुल्यांनी भरपूर असल्याने बाजारात या भाजीला चांगला दर मिळतो. सध्या मुंबई apmc भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये या करटुलीचा बाजारभाव साधारणतः २५०रु प्रतिकिलो इतका आहे. त्यामुळे काही शेतकरी याचे व्यवसायिक उत्पादन देखील घेत आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने महाग असणाऱ्या या करटुलीची तुम्ही घरगुती पद्धतीने लागवड करून देखील या पासून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा लाभ घेऊ शकता.   कृषी विद्यापीठांनी या रान भाजीच्या काही आधुनिक जाती देखील   तयार केल्या आहेत.  
परंतु, या पद्धतीत नर झाडांचे प्रमाण जास्त असल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे भारतीय बागवणी अनुसंधान भुवनेश्वर आणि भारतीय बागवणी अनुसंधान बेगलुरू यांनी विकसित केलेल्या अनुक्रमे अर्का भारत आणि नीलांचन गौरव या सुधारित जाती चांगल्या आहेत. या पद्धतीत नर मादी परागीकरण करून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो. विकिसित वाणाच्या फळाचा आकार मोठा आहे. आणि बाजारात दर देखील चांगला आहे.