मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; पुढच्या आठवड्यात होणार घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पुढच्या आठवड्यात होणार घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-“दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पुढच्या आठवड्यात घोषणा – CM फडणवीस”
-“६० लाख हेक्टर नुकसान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत”
-“ओला दुष्काळ जाहीर नाही, पण सगळ्या सवलती लागू – CM फडणवीस”
मुंबई – राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ६० लाख हेक्टर क्षेत्राचे पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सरकारने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.
“शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत पोहचेल. त्यासाठी पुढच्या आठवड्यात आम्ही सर्वसमावेशक मदत धोरण जाहीर करू,” असे फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले.
ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असून ई-केवायसीची अट रद्द करून थेट शेत नोंदीप्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पिकांची हानी, जमिनी खरडून जाणे, विहिरींची हानी, घरांचे नुकसान यासाठी स्वतंत्र मदत पॅकेज ठरवले जाईल.
फडणवीस म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूद कुठेच नाही. मात्र ज्या सवलती दुष्काळात दिल्या जातात, त्या सर्व सुविधा आणि मदतीची अंमलबजावणी आता आम्ही करणार आहोत.”
दरम्यान, केंद्र सरकारकडून मदत मिळणार असून त्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल. मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून थेट मदत दिली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.