गाईच्या शेणापासून होतीये कमाई , जाणून घ्या योग्य माहिती
किटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. यामुळे शेती नापिक होते. त्यामुळे आता पुन्हा सेंद्रीय शेतीची मागणी वाढत आहे. बेगुसरायचे मुनीलाल महतो जैविक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांना योग्य भावात शेणापासून तयार झालेले खताची विक्री करतात. विशेष म्हणजे लोकं त्यांना अॅडव्हान्स देऊन शेणाचे खत विकत घेतात.न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, मुनीलाल महतो यांना जैविक मॅन म्हणून या परिसरात ओळखले जाते. मुनीलाल शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले आहे. मुनीलाल स्वतः जैविक पद्धतीने शेती करतात. २०१३ पासून ते पूर्णपणे जैविक शेती करतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.जैविक शेतीतील उत्पादनाला चांगला भाव
चेरीया बरीयारपूर भागातील गोपालपूर पंचायतीचे शेतकरी प्रमोद महतो यांनी सांगितले की, मीसुद्धा मुनीलाल महतो यांच्यापासून प्रेरणा घेऊन जैविक शेती सुरू केली. व्हर्मी कंपोस्टने चांगले उत्पादन घेत आहेत. प्रमोद महतो म्हणातात, जैविक पद्धतीने शेती केल्यास त्यात तयार झालेल्या मालाला चांगला भाव मिळतो. यामुळे शेतकरी आता जैविक शेतीकडे वळत आहे.
रासायनिक खत ४० रुपये किलो
मुनीलाल महोत यांच्या मते, बाजारात रासायनिक खत ४० रुपये किलो विकत आहे. परंतु, जैविक खत फक्त सहा रुपये किलो आहे. रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतीत सहा वेळा सिंचन करावे लागते. परंतु, जैविक विधीने उत्पादन घेतल्यास फक्त तीन वेळा पाण्याची गरज पडते.
जैविक खतातून वार्षिक उत्पन्न
मुनीलाल यांच्याकडे दोन गायी आहेत. शेणापासून जैविक खात तयार करतात. दोन एकर जमिनीत ते जैविक खताचा वापर करतात. उर्वरित खताची ते विक्री करतात. त्यातून त्यांना दरवर्षी ६० हजार रुपये मिळतात. मुनीलाल हे किटकनाशकाच्या रूपात गोमुत्र वापरतात. यामुळे पिकांचे नुकसान होत नाही.