शेतकरी–विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

-शेतकरी भवन योजनेस मुदतवाढ, विद्यार्थ्यांच्या भत्त्यात दुप्पट वाढ
-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकरी-विद्यार्थ्यांना दिलासा
-कॅबिनेट मीटिंगमध्ये ८ मोठे निर्णय शेतकरी–विद्यार्थ्यांचा फायदा ठळक
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरात ७९ नवीन शेतकरी भवन उभारणी व दुरुस्तीसाठी एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला. यामुळे शेतकरी वर्गाला बाजारपेठेत आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
याचबरोबर, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात व स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुप्पट वाढ करून हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
बैठकीतील इतर निर्णय :
• महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर, ३,२६८ कोटींचा आराखडा.
• निळकंठ सहकारी सूतगिरणीला शासन अर्थसहाय्य.
• आधुनिक संत्रा केंद्र उभारणी योजनेस मुदतवाढ व बदल.
• भंडारा–गडचिरोली ९४ कि.मी. द्रुतगती महामार्गास मान्यता (९३१ कोटी).
• ५ हजार मेगावॅट क्षमतेच्या नवकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी संयुक्त कंपनी.
• राज्य पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा.