सोयाबीनची आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव
सोयाबीनची   आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव
तुरीला ७ हजार ८३५ रुपये असा भाव मिळत आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर वातावरणात बदल झाल्याने पिकांना अनुकूल असे वातावरण तयार झाले, गहु हरभरा पिकांच्या वाढीसाठी व परिपक्व होण्यासाठी लागणारी थंडी सध्या असल्याने पिके चांगलीच जोमात आली आहेत. सोयाबीनची आवक घटली आहे. सध्या सोयाबीनला ५ हजार ३७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव   घसरल्याने लागवड आणि मशागतीचा खर्च देखील मिळत नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दररोज १५ हजार क्विंटल पेक्षा जास्त असलेली आवक आता आठ हजार क्विंटलवर येऊन ठेपली आहे. तुरीला मात्र ७ हजार ८३५ रुपये असा चांगला भाव मिळतो आहे. ज्वारी ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल विकली जात आहे.त्याचप्रमाणे विदर्भातील रब्बीतील महत्वाचं पीक म्हणून ओळख असलेल्या हरभरा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा हजारो हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली असून,वातावरणात झालेल्या बदलामुळे काही ठिकाणी हरभरा पीक काढणी सुरू झाली आहे.यंदा हरभरा पिकाच चांगलं उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.