PM Kisan Status : ये रे ये रे पैसा! 28 जुलै रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार लक्ष्मी
नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) हप्ता एक दोन दिवसांत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यांचे चेहरे आता खुलणार आहे. अनेक भागात मुसळधार, दमदार पाऊस झाला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांना गरजेच्या वेळीच या योजनेतील 14 वा हफ्ता या दिवशी त्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कोट्यवधी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यांना अनेक खर्चासाठी हा निधी उपयोगी पडेल. तर ही चूक भोवल्याने या शेतकऱ्यांच्या खात्यात छद्दाम पण जमा होणार नाही. या कास्तकारांनी झटपट ही दुरुस्ती करावी, तर ते पण या योजनेसाठी पात्र होतील.
ई-केवायसी केलं का?
बोगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने जालीम उपाय केला आहे. त्यासाठी पीएम किसान मोबाईल ॲप आणले आहे. या मोबाईल ॲपमुळे पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळेल. या ॲपमध्ये फेस ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञाना आधारे शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अगदी सहज करता येईल. त्यांना वन टाईम पासवर्ड आणि फिंगरप्रिंटची गरज राहणार नाही.
काय आहे योजना
या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. वार्षिक 6 हजार रुपये केंद्र सरकार जमा करते. वर्षात 2-2-2 हजारांचे असे तीन हप्ते जमा करतात. राज्य सरकारने पण इतकीच रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.
14 वा हप्ता जमा होईल
केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 13 हप्ते जमा करण्यात आले आहे. देशभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. 28 जुलै रोजी 14वा हप्ता जमा होईल.
हे आहेत हेल्पलाईन क्रमांक
पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266
14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606
इतक्या शेतकऱ्यांना लाभ
केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्याही तारखेची घोषणा केलेली नाही. पीएम मोदी पुढील महिन्याच्या आत 14 वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यावेळी देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 14 वा हप्ता जमा करणार आहे.
तुमचे नाव यादीत आहे की नाही, भाऊ?
14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल
ठणठणगोपाल शेतकरी
या योजनेच्या यादीत तुमचे नाव नसेल तर केवायसी अपडेट केले का याची शहानिशा करा. तुमच्या जमिनीची पडताळणी झाली आहे की नाही, याचा तपास घ्या. जवळच्या कृषी कार्यालयाशी लगेचच संपर्क साधा. हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. जर तुम्ही या प्रक्रिया केल्या नसतील, तर योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.