मुंबई APMC होलसेल फळ मार्केटमधे आंब्याची विक्रमी आवक
नवी मुंबई :मुंबई APMC फळ मार्क़ेटमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख २० हजार पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये ७५ हजार पेटी कोकणातील हापूस तर इत्तर राज्यातून ४५ हजार पेटी आंबा मार्केटमधे दाखल झाली आहे .बाजार आवारत सध्या अंबामय झाली आहे .रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक, तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ७५ हजार १२० व इतर राज्यांतून ४५ हजार २३० अशा एकूण १ लाख २० हजार   पेट्यांची आवक झाली.
आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत. कोकणच्या हापूसला मार्केटमधे   २०० ते ५०० रुपये डझन भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस ५०० ते १००० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ५० ते ८० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६० , गोळा ३५ ते ४० ,केशर ८० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे.