Soybean Market : सोयाबीनवर खाद्यतेल आयातीचा दबाव - आयात तब्बल ३० टक्क्यांनी वाढली
Soybean Oil : देशात यंदा खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्या नऊ महिन्यांमध्ये खाद्यतेल आयात तब्बल ३० टक्क्यांनी वाढली आहे. याचा देशातील तेलबिया बाजारावर दबाव आहे. शेतकरी सोयाबीन दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र खाद्यतेल आयात वाढल्याने देशात उत्पादीत झालेल्या सोयातेलाला उठाव मिळत नाही.
देशातील बाजारात मागील तीन ते चार महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांनी मागील हंगामात चांगला भाव मिळाल्याने यंदाही सोयाबीन मागे ठेवले. पण सतत भाव दबावात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. देशातील सोयाबीनही महत्वाच्या तेलबियांचे भाव दबावात राहण्यामागे वाढलेली खाद्यतेल आयात हेही एक प्रमुख कारण आहे. देशात चालू तेल विपणन वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये म्हणजेच नऊ महिन्यांमध्ये देशातील खाद्यतेल आयात तब्बल २५ टक्क्यांनी वाढली.
द साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने देिलेल्या माहितीनुसार, देशात नोव्हेंबर २०२२ ते जुलै २०२३ या काळात १२१ लाख २२ हजार टन खाद्यतेलाची आयात आयात झाली. मागील तेल वर्षात याच नऊ महिन्यांमधील आयात जवळपास ९७ लाख टनांवरच होती. म्हणजेच यंदा आयात २५ टक्क्यांनी वाढली आहे. यंदाची आयात तब्बल २४ लाख टनांनी अधिक आहे.
सोयातेल आयात घटली,सूर्यफुलाची वाढली
सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात ५० लाख टनांवर पोचली. ही आयात गेल्यावर्षीपेक्षा दोन लाख टनांनी जास्त आहे. तर एकूण आयातीत या दोन्ही तेलांचा वाटा ९ टक्क्यांनी कमी होऊन ४१ टक्क्यांवर पोचला. भारताने या नऊ महिन्यांमध्ये २८ लाख २४ हजार टनांची आयात केली. मागील हंगामात याच काळातील आयात ३३ लाख ३० हजार टन आयात झाली होती. सूर्यफुल तेलाची आयात मागील हंगामात पहिल्या नऊ महिन्यांमध्ये १५ लाख टन झाली होती. ती यंदा जवळपास २२ लाख टनांवर पोचली.