G20 Summit : Dinner Diplomacy! मुकेश अंबानी यांच्यासह गौतम अदानी यांच्यापर्यंत उद्योग जगत जी20 च्या प्लॅटफॉर्मवर
नवी दिल्ली : जी-20 संमेलनात (G20 Summit) देशातील दिग्गज व्यावसायिक, उद्योजक सहभागी होत आहे. जगातील दिग्गज अर्थव्यवस्था एकत्र येत असल्याने भारतासाठी ही मोठी संधी आहे. भारतात होणारे बदल या संमेलनात दाखविण्यात येत आहे. बदलत्या भारताचे चित्र संपूर्ण जगाला दिसत आहे. जगात मंदीचे वार वाहत असताना भारत घेत असलेली झेप सर्वांसाठी थक्क करणारी आहे. यामध्ये भारतीय उद्योग जगत पण मागे नाही. त्यांचा पण राबता या संमेलनात दिसून येत आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह उद्योग जगतातील 500 पेक्षा अधिक उद्योजक या संमेलनाला हजेरी लावतील. डिनर डिप्लोमसीतून (Dinner Diplomacy) ते उद्योगांसाठी नव्या संधी शोधतील. इतर देशात त्यांच्या विस्ताराची चाचपणी करतील. तर इतर देशांतील उद्योजक, कंपन्यांना भारतीय कंपन्या, उद्योजक यांच्याशी संवाद साधता येईल. त्यामाध्यमातून मोठी उलाढाल होण्याची संधी आहे.
जगातील नेते लावतील हजेरी
चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या नाजूक आहे. ही सोन्यासारखी संधी भारत इनकॅश करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जी-जी-20 हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक (British PM Rishi Sunak), सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि इतर दिग्गज नेते सहभागी होत आहे. तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (China President Xi Jinping) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) हे दोघेही या समेंलनात उपस्थित नसतील.
हे दिग्गज होतील सहभागी
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार या संमेलनात मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, सुनील मित्तल, कुमार मंगलम आणि इतर अनेक दिग्गज उद्योगपती सहभागी होतील. या संमेलनात जवळपास 500 उद्योगपती सहभागी होणार आहे. देशाचे उद्योग जगत या प्लॅटफॉर्मवर दिसेल.
दोन दिवस संमेलन
हे संमेलन दोन दिवस चालेल. नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी 20 संमेलन होत आहे. दिल्लीतील प्रगती मैदानात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन स्थळी या संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. या संमेलनाच्या ठिकाणाला भारत मंडपम असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी जगातील दिग्गज नेते उपस्थित असतील. यामाध्यमातून भारताची मोठी छाप पडेल. भारताला त्याचा मोठा फायदा होईल.