APMC प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी कामांसाठी पणन संचालकांकडून २० लाखाची मंजुरी घेऊन सुद्धा कामे अद्याप सुरु नाही
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील   पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे लवकर करावा यासाठी पणन संचालक कडून मंजुरी मिळुन सुद्धा मार्केटमधे अद्याप कामे सुरू झाली नाहीयेत. हे सर्व पाहता पावसाळ्यापूर्वी कामे होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी हि मार्केट पाण्यात   जाणार का असा   प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई Apmc   मधील कांदा बटाटा ,मसाला आणि धान्य   मार्केटच्या गटाराची साफसफाई कामासाठी बाजार समिती प्रशासनाने २० लाखांची   मंजुरी पणन संचालकाकडून घेतल्याचे सचिव राजेश भुसारी यांनी सांगितले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे आगमन काहीच दिवसात होतात असल्याची शक्यता   वर्तवली जात आहे मात्र गटारची साफसफाई अद्याप सुरु झाली नाही.
धान्य मार्केटमधे एका वर्षात जवळपास ५० टक्के गटारांची नवीन बांधकामे पूर्ण झाली आहे तरी सुद्धा निविदा काढण्यात आल्याचे समजते.   यामध्ये कार्यकारी अभियंता आणि मार्केट अभियंता कंत्राटदाराच्या फायद्यासाठी संपूर्ण मार्केटचा   निविदा काढल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे .प्रत्यक्षात मार्केटमधे नवीन कामे झाल्याने परत गटारांची साफसफाई करण्याची गरज नाही तरी सुद्धा मार्केटच्या १४ विंगच्या गटारांची साफसफाई कामे साठी निविदा काढण्यात येत आहे असं समजते   .कार्यकारी अभियंता ,   मार्केट अभियंता आणि कंत्राटदाराच्या सहमताने बाजार समितीच्या तिजोरीतून डल्ला   मारण्यासाठी   नवीन उपक्रम सुरु केल्याची चर्चा बाजार आवारत सुरु आहे ,नवीन काम ५० टक्के होऊन सुधा परत सर्व विंगच्या निविदा काढण्याची गरज का ? हा   निविदा रद्द करून चुकीची माहिती   देणाऱ्या मार्केट अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी बाजार घटक करीत आहे.
दरवर्षी पावसाळापूर्व मार्केटमधे नाले साफसफाई, गटारांची स्वच्छता Apmc प्रशासनाकडून केली जाते. त्यासाठी निविदा मागविली जाते. मात्र कामे पावसाळ्यापूर्वी होत नसल्याने आणि ती घाईगडबडीत होत असल्याने निकृष्ट कामांचा दर्जा सातत्याने पुढे येत असतो   . पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने व्यापारी,ग्राहक आणि माथाडी कामगाराना नाहक त्रास सहन करावा लागतो . त्यामुळे यंदा नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे मंजुरी पणन संचालक यांनी दिले आहे   .मात्र अद्याप काम सुरु झाली नाही कामांचा वेग पहाता ती वेळेत पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.मार्केटमधे कोट्यवधी रुपयांची सेस भरून सुधा मार्केट दरवर्षी पाण्यात जातात यावर्षी पण जाणार अशी माहिती व्यापाऱ्याने दिले आहे .मुंबई Apmc सचिव राजेश भुसारी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे .