नवी मुंबई महापालिकेचा ४९२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर
नवी मुंबई महापालिकेचा ४९२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर
- नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य    
- यंदा १ हजार 548 कोटी रुपयांची वाढ
- ४९२५ कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर
- परिवहन विभागाला मुक्तहस्ते निधी देण्याची तरतूद
नवी मुंबई: प्रशासक राजवट असल्याने अर्थसंकल्प पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला…
नागरिकांना दिलासा देणारा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करताना नागरी सुविधांवर होणाऱ्या खर्चात तब्बल ११.४८ टक्के इतकी वाढ झाली आहे. अडीच लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करताना ४९२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे ..करोनाच्या विळख्यातून बाहेर पडताना शहरातील नागरिकांना अधिक दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा करवाढ करण्याचे टाळण्यात आले आहे.कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प सादर करताना स्थानिक संस्था कराच्या रुपात कर गोळा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.परिवहन विभागाला देखील मुक्तहस्ते निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.आरोग्य आणि शिक्षण विभागापेक्षा अधिक खर्च हा परिवहन विभागाला दिला जाणार आहे....महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून कोणतेही कर्ज नाही. यामुळे यावर्षीही कोणतीच करवाढ केलेली नाही. सर्वोत्तम पायाभूत सुविधांसह पर्यावरण रक्षण, आरोग्य व शहर सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे.
महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे ..