मुंबई APMC धान्य मार्केट E विंगच्या फुटपाथवर जवळपास ५०० चौरस फुटाचे अनधिकृतपणे पत्राचे शेड मारून केला अतिक्रमण

मुंबई APMC धान्य मार्केट अभियंताच्या फुटपाथवर   स्टॉल आणि पत्राच्या शेड टाकण्याची ‘अर्थ ‘पूर्ण ‘अभय योजना
फुटपाथवर अनधिकृतपणे स्टॉल आणि जागे अतिक्रमण   करणाऱ्या लोकासाठी Apmc प्रशासनकडून ‘रेड कार्पेट’
बाजार घटकांना खड्यात आणि पाण्यात टाकून त्याचें फुटपाथ गायब करणाऱ्या या नियोजन शून्य अभियंता आणि मुख्य सुरक्षा अधिकारीवर कारवाई होणार या क्लीन चिट मिळणार!
मुंबई Apmc अभियांत्रिक विभाग व विकास शाखा कोणाच्या करतात विकास.
या अनुभव शून्य उपअभियंताना पाठिंबा देणाऱ्या मास्टरमाइंड कोण ?
मुबई APMCचे मुख्य सुरक्षा अधिकारी व मार्केट अभियंताने दाखवली सचिवांच्या आदेशाला केराची टोपली
नवी मुंबई : मुंबई Apmc प्रशासनाने धान्य मार्केटमधे काही महिन्यांपूर्वी   कोट्यवधी   रुपये खर्च करून रस्ते ,गटार आणि फुटपाथचे   काम केला होता ,फुटपाथवर लाखो रुपये खर्च करुन व्यापारी,माथाडी कामगार आणि ग्राहकासाठी नवीन पदपथाची कामे करण्यात   आली .A,B विंगच्या पदपथावर पहिल्या   स्टॉल धारकांनी   अवैध बांधकाम करुन स्टॉल टाकली आणि आता E विंग च्या वाहेर फुटपाथवर जवळपास 500 चौरस फुटाचे पत्राचे शेड टाकून अनधिकृतपणे अतिक्रमण   करण्यात आली आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केट मधे फुटपाथ गायब होण्याची शक्यता वर्तविले जात आहे .या अगोदर पण व्यापार भवनच्या बाजूला असलेल्या उद्यानाची झाडे कापून त्या जागेवर अनधिकृतपणे शेड टाकण्यात आला होता त्यावेळी महापालिका कारवाइ केला होता .सदर बांधकाम सुट्टीचा दिवशी करण्यात आली होती .मार्केटमधे जे काही बांधकाम होतत सर्व सुट्टीच्या दिवशी केला जातो . मुख्य सुरक्षा अधिकारी व मार्केट अभियंताच्या आशिर्वादाने फूटपाथवर अनधिकृतपणे शेतमालाची   व्यवसाय ,अवैध बांधकाम,   स्टॉल धारकांची अनधिकृतपणे अतिक्रमणमुळे मार्केट बकाल झाली आहे .मुख्य सुरक्षा अधिकारी , मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंताच्या अर्थपूर्ण सहयोग मुळे लोकांना चालण्यासाठी निर्माण केलेले फुटपाथ सुद्धा गायब होताना दिसून येत   आहेत. काही दिवसांपूर्वी सचिव पी एल खंडगले यांनी मुख्यालयात बैठक   घेऊन सर्व उप   अभियंता ,उप सचिव ,मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याना पत्र दिले होते,मात्र सचिवांचा आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्य सुरक्षा अधिकारी व काही अभियंता बिनधास्त झाली आहे .त्यामुळे सचिवांच्या आदेशाला   या लोकांची भित्ती राहिलेले नाही ,ज्यावेळी कारवाई केला जातोय त्यावेळी या मुख्य सुरक्षा अधिकारी व अभियंता संचालक आणि राजकीय लोकांच्या वापर करतात .त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केट सुरक्षित राहणार नाही अशी चित्र दिसून येत आहे .यावर सचिव आणि नवीन आलेले संचालक काय कारवाई करतील याकडे सर्व बाजारघटकांची लक्ष लागली आहे.