मुंबई APMCतील दाना मार्केटमध्ये कडधान्यांच दुकान जाळून खाक
 
-गाळ्यात   मोठा प्रमाणात कडधान्य ,मसाले साठवणूक करण्यात आल्या होता
नवी मुंबई : मुंबई APMC दाना मार्केटच्या B विंगमधील आशापुरा दुकानात आज सकाळी ८च्या सुमारास भीषण आग लागली आहे . याठिकाणी   मोठ्या प्रमाणात कडधान्य ,मसाले साठवण्यात आले होते. त्यामुळे हे गाळे कम गोदाम   जाळून खाक झाले आहे . आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत होते . गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठ असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत होता .या विंग मध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार व गोदाम  आहेत, त्यामुळे हि आग दुपारी लागली असती तर संपूर्ण विंग जाळून खाक झाली असती, मात्र दाना मार्केटमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्याने वेळीच ही आग आटोक्यात आनण्यात आली, अन्यथा इतर विंग मध्ये ही आग पासरण्याची शक्यता होती.