मुंबई APMC मसाला मार्केटच्या 62 कोटी FSI व शौचालयचे 8 कोटी रुपयांची घोटाळाचा फाईल बंद करण्यासाठी महायुती व काँग्रेसची छुपा युती !

बहुमत असताना महयुतीने काँग्रेसला उप सभापती पदावर बसवले यावर वरिष्ठांची चर्चा महासंघ करणार -बाळासाहेब नाहाटा (महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघाचे अध्यक्ष)
शौचालय व FSI घोटाळ्याची मुख्य सूत्रधार मार्केट संचालक यांनी केला वनमंत्री गणेश नाईक (दादा )याना दिशाभूल
-मुंबई APMC सभापती निवडणुकीत महायुती आणि काँग्रेसची झाली युती राजयकीय वर्तुळातील नवं गणित.
-मुंबई APMC उपसभापतींच्या नियुक्तीवरुन उप मुख्यमंत्री ,पणन मंत्री नाराज!
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बिनविरोध निवडणूक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या शिंदे गटाचा सभापती समितीत निवडला गेला. शिवसेना शिंदे गटाचे प्रभू पाटील हे सभापतीपदी व काँग्रेसचे हुकूमचंद आमदार हे उपसभापती पदी बिनविरोध निवडून आल्याने बाजार समितीत मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या मागची मुख्य कारण बाजार समितीतील मसाला मार्केटच्या 62 कोटी रुपयांचा Fsi घोटाळा व शौचालय घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक न घेता बिनविरोध सभापती व उपसभापती निवडल्याने झालेला घोटाळा बंद करण्यासाठी ही योजना आखली गेली असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाटा यांनी एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलला दिली आहे. याबाबत लवकरात लवकर पणन मंत्री आणि अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी संघ जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या निवडणुकीत बहुमत असताना देखील महायुतीच्या उमेदवाराला उपसभापती पद न देता मविआचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील उमेदवाराला उपसभापती पद दिल्याने अजितदादा आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांचा नाराजीचा सूर असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी Fsi घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले मार्केट संचालक इतर संचालकांना सोबत घेऊन सकाळी वाईट हाऊस मध्ये हजर झाले व त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत दादांचा आशीर्वाद घेतला व ते मुख्यालयात आले. दादांच्या आशीर्वाद घेताना मार्केट संचालक यांनी सांगितलं की मी शौचालय घोटाळात तुरुंगात जायुन आलो आता मला परत जायच नाही .आता FSI घोटाळा मधे सुद्धा माझा नाव आहे त्यामुळे मला FSI आणि शौचालय घोटाळ्यातून मुक्त करा अशी माहिती एका संचालकांनी नाव न सांगण्यात अटीशर्ती वर दिली आहे .
-पाहूया बहुमताचे गणित
महायुतीचे शिवसेना शिंदे गटातील १-प्रभू पाटील ,२-माधवराव जाधव ,शासन नियुक्त संचालक ३-सतीश हरिदास ताठे, ४-दिलावर मिर्झा बेग, ५- शिल्पा शिवाजी पाटील,६- मीना माहारू राठोड,७- सांडु गुलशेर तडवी,राष्ट्रवादी कांग्रेस (अजित दादा पवार ) गटाचे १-अशोक डक ,२-बाळासाहेब सोळस्कर ,३-जयदत्त होळकर ,४-सुधीर कोठारी ,भाजपचे १-निलेश वीरा ,२-विजय भुट्टा ,३-संजय पानसरे ,४-शंकर पिंगळे, महाविकास आघाडी १- शशिकांत शिंदे ,२-अशोक वाळुंज ,३- प्रवीण देशमुख ,४- हुकूमचंद आमदारे ,५-बैजनाथ शिंदे,६-धनंजय वाडकर
सभापती व उप सभापती पदासाठी निवडणुकीत बिनविरोध झाली , महायुतीमध्ये बहुमत १५ संचालक , महाविकास आघाडीत ६ संचालक असताना कांग्रेसच्या उमेदवाराला उप सभापती पदावर देण्यात आल्याने भाजप आणि काँग्रेसची छुपी युती झाली आहे त्यामुळे राजयकीय वर्तुळातील नवं गणित पाहायला मिळतोय आहे.