Apmc मार्केटमधील स्टॉल धारकांकडून श्रीखंड खाऊन अभियंत्यानी दाखवली व्यपाऱ्यांना केराची टोपली!
नवी मुंबई : मुंबई apmc धान्य मार्केट मध्ये विकास कामांच्या नावाने बोंब होती पण   वर्ष २०२२ मध्ये व्यापारी , वाहतूकदार   आणि   माथाडी कामगारांना आशेचा किरण दिसला. सगळीकडे उत्साहच वातावरण होत.कामांना मुहूर्त मिळाल्याने व्यापाऱ्याने नारळ फोडून कामांचे उदघाटन केला त्यावेळी मार्केटचे   कार्यकारी   अभियंता सुरेश मोहाडे यांना शाल व मिठाई भरवून त्यांचं स्वागत करण्यात आले. रखडलेली काम पूर्ण करून व्यापाऱ्यांच्या मनात घर निर्माण केले मात्र दुसरीकडे स्टॉल धारकांशी हात मिळवणी करून   नवीन बांधकाम झालेल्या फुटपाथवर वाढीव   बांधकाम   करून   स्टॉल टाकणयासाठी कार्यकारी अभियंता   आणि मार्केट   उप अभियंता यांनी मदत केली त्यामुळे   व्यापारांनी दिलेली शाल आणि श्रीफळापेक्षा स्टाल धारकांच्या श्रीखंड खाऊन कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांनी बाजार घटकाना दाखवली केराची टोपली. मार्केटमध्ये   जवळपास ६ कोटी रुपयांचा निविदा   काढून बाजारातील रस्ते , गटारे , फुटपाथचे काम सुरु आहे. काम सुरु करण्याच्या आधी सर्व फुटपाथवरील स्टाल रिकामे करण्यात आले होते पण जसेजसे कामी संपले तस अभियंतांनी स्टॉल धारकांशी हात मिळवणी करून पुन्हा स्टाल उभारले आहेत. अश्या अभियन्तामुळे मार्केटचे फुटपाथ गायब झाल्याचे दिसून येत आहे .   या अभियंत्यांची मार्केट मधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी बाजार घटक करीत आहेत.