सभापती अशोक डक यांच्या पाहणी दौऱ्यानंतर भाजीपाला मार्केट मध्ये कांदा बटाटा लसणाच्या अवैध व्यापार जोरात
सभापती अशोक डक यांच्या पाहणी दौऱ्यानंतर भाजीपाला मार्केट मध्ये कांदा बटाटा लसणाच्या अवैध व्यापार जोरात
कॅन्टीन हॉटल, जेलच्या नावाने   मार्केटमध्ये कांदा ,बटाटा,लसणाचा किरकोळ व्यापार
शेतकऱ्यांसोबत, ग्राहक व बाजारसमितीला   होते मोठे आर्थिक नुकसान
मार्केट संचालक, सुरक्षा अधिकारी आणि बाजार समितीप्रशासनाच्या युतीमुळे मार्केटचे झाले वाटोळे
मुंबई apmcचे कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी काल २१ जून रोजी मुंबई APMC भाजीपाला बाजारात पाहणी दौरा केला. मात्र त्यानंतर भाजीपाला मार्केट मध्ये अनधिकृतपणे कांदा बटाटा लसणाच्या विक्रीने जोर धरल्याचे दिसून आले आहे.
मुंबई apmcभाजी पाला ,मार्केट मध्ये कॅन्टीन हॉटल, जेलईत्यादी घटकांना शेतमाला सोबत पुरवठा   करण्यासाठि २३ व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती त्यात काही अटींचा समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये   भाजीपाला बाजार आवारात कांदा   बटाटा लसूण विक्री करण्यात येणार नाही , बाजार आवारात आणलेला कांदा, बटाटा, लसून हा शेतमाल फक्त कॅन्टीन हॉटल, जेलईत्यादी घटकांना शेतमाला सोबत पुरवठा करण्याकरिता आणता येईल असा आदेश बाजार समिती प्रशासनाकडून काढण्यात आला होता मात्र बाजार आवारात ए आणि डी विंगमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाची अवैध विक्री सुरू आहे. ह सर्व व्यापार मार्केट संचालक, सुरक्षा अधिकारी आणि बाजार समितीप्रशासनाच्या देखरेखीखाली सुरु आहे. कांदा बटाटा मार्केट सकाळी ८ वाजता सुरू होत असल्याने रात्री भाजीपाल्याबरोबर कांदा-बटाटा पुरवठ्यासाठी भाजीपाला बाजारात आणला जातो.   मात्र कांदा, बटाटा, लसून शेतमाल बाजार आवारात दुपारी ३ ते ६ या वेळतच आणता येईल तसेच उपरोक्त सुचनांचे उल्लंघन झाल्यास भाजीबाजार आवारात कांदा, बटाटा, लसून हा   शेतमाल आणण्याची परवानगी रद्द करण्यात येईल   असे आदेश असताना देखिल येथे राजरोसपणे अनधिकृत व्यापार होताना दिसत आहे. तर याबाबत बाजार समिती प्रशासन दंडात्मक कारवाई कधी हाती घेणार व   अशा प्रकारे अवैध व्यापार करणाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार अशी मागणी जोर धरू लागली आहे 
भाजीबाजार आवारात एका वेळी जास्तीत जास्त ५० गोण्या कांदा बटाटा लसूण   कांदा बटाटा मार्केटची काटपट्टी दाखवून आणता येईल पण तरीही   २५ ते ३०   व्यापारी अनधिकृतपणे   भाजीपाला मार्केटमध्ये   कांदा   ,बटाटा,आणि लसूणाची किरकोळ व्यबसाय   करत आहेत. मात्र याचा फटका मोठ्या शेतकऱ्यांसोबत, ग्राहक व बाजारसमितीला बसणार आहे. भाजीपाला मार्केट मध्ये कांदा   बटाटा आणि लसूणचा अनधिकृत पणे विक्री केली   जात आहे . या व्यापार्यामुळे कांदा बटाटा   मार्केटच्या व्यापाऱ्यांना मोठा प्रमाणात नुकसान होत असून बाजार समितीला देखील आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.   यामध्ये कांदा बटाटा मार्केट संचालक गप्प का असे प्रश्न   उपस्थित केला जात आहे .
१. भाजीपाला बाजार आवारात कांदा, बटाटा, लसून आणण्यासाठी रितसर रूपये २५०००/ अनामत रक्कम ठेऊन उपसचिव कार्यालयाची परवानगी घेण्यात यावी.
२. भाजीबाजार आवारात एका वेळी जास्तीत जास्त ५० गोण्या कांदा / बटाटा, लसूण फक्त कांदा बटाटा मार्केटची काटापटटी दाखवून आणता येईल.
३. प्रत्येक गोणी मांगे रुपये २/- प्रमाणे सेवाशुल्क आकारण्यात येईल. ४. भाजी बाजार आवारामध्ये कांदा, बटाटा लसून विकता येणार नाही.
५. भाजी बाजार आवारात आणलेला कांदा, बटाटा, लसून हा शेतमाल फक्त कॅन्टीन हॉटल, जेलईत्यादी घटकांना शेतमाला सोबत पुरवठा करण्याकरिता आणता येईल.
६. कांदा, बटाटा, लसून शेतमाल बाजार आवारात दुपारी ३ ते ६ या वेळतच आणता येईल उपरोक्त सुचनांचे उल्लंघन झाल्यास भाजीबाजार आवारात कांदा, बटाटा, लसून या शेतमाल आणण्याची परवानगी रदद करण्यात येईल. त्याचप्रमाणे संबंधीत अनुज्ञप्तीधारकांचे अनुज्ञप्ती निलंबन रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असे आदेश बाजार समितीकडून   काढण्यात आले होते या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे .