APMC प्रशासनाचा अजब गजब कारभार - 300 रु अनलिमिटेड कॉल असताना अधिकाऱ्यांना मिळतो 2400 रु भत्ता
Mumbai Apmc Administration: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील आस्थापना विभागात   काम करणाऱ्या जवळपास   ३० अधिकाऱ्याना मोबाईल बिल भत्ता प्रतिमह २४००रुपये   apmc प्रशासन कडून देण्यात येत आहे ..एकीकडे Apmc प्रशासन आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे तरीही अधिकाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त मोबाईल भत्ता देण्यासाठी APMC प्रशासन सक्षम आहे का ? असा सवाल उपस्थित राहिलाय. मार्केट मधील सुधारणा करण्याऐवजी अधिकाऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यात प्रशासन व्यस्त आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचा मोबाईल भत्ता बंद करा असे बाजार घटक सांगत आहेत.
तुम्ही जर जिओ,एअरटेल किंवा अन्य कोणता हि सिम वापरत असाल तर प्रति महिना २५० ते ३०० रुपयांपर्यंत २GB नेट सह त्याच किमतीत अन्य सुविधा अनलिमिटेड   उपलब्ध असतात. मग अधिकारी नक्की कोणता उच्च दर्जाचा सिम वापरत आहे २४०० रु दर महिना कशासाठी लागतात ? apmc तिजोरीतून २४०० रुपये मोबाईल भत्ता देण्याच्या मागे काय उदेश्य काय या मोबाईल भत्ता बंद करण्यात   यावी अशी मागणी बाजार घटक करीत आहे. अधिकाऱ्यांचे इतके लाड प्रशासन का करतंय असे अनेक प्रश्न बाजार घटकांना पडत आहेत.