मुंबई APMC प्रशासनाच्या अजब गजब कारभार - कांदा-बटाटा मिनी मार्केटसाठी हाय टेन्शन वायरच्या खाली सपाटीकरण
Mumbai APMC Vegetable Market: मुंबई APMC भाजीपाला मार्केट गेट क्रमांक ७ जवळ   हाय टेन्शनच्या वायरखाली जागा सपाटीकरण करण्याचे काम   युद्ध पातळीवर सुरु आहे ,
सिडकोनी बाजार समितीला २ प्लॉट दिले होते त्यापैकी एका प्लॉटवर झाडे लावण्यात आली तर दुसर्या प्लॉटवर झाडे न लावता या जागेवर अनधिकृतपणे सपाटीकरण करून कांदा बटाटा मिनिमार्केट आणि भाजीपाल्याचा किरकोळ वापर करण्याची तयारी सुरु   असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच पहिल्या टप्यात कांदा बटाटा व्यपाऱ्याना जागेची आखणी करून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती सूत्राने दिली आहे . 
सदरची जागा बाजार समितीच्या ताब्यात असून हाय टेन्शनच्या वायरखाली व्यवसाय   करण्यास मनाई आहे तरीसुद्धा बाजार समिती प्रशासनातर्फे कांदा बटाटा आणि लसणाचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे . या जागेवर फक्त मिनी पार्क आणि झाडे लावू शकतात मात्र या जागेत भाजीपाला मार्केटच्या काही व्यपाऱ्यानी या हाय टेन्शनच्या वायर खाली जेसीबी आणि पोखलांन लाउन सपाटीकरण करून पहिल्या टप्यात कांदा ,बटाटा व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे असे दिसून येत आहे . त्यामुळे येणाऱ्या काळात हाय टेन्शन वायरच्या खाली पूर्ण मार्केट दिसणार आणि यामध्ये मोठी जीवित हानी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.   त्यामुळे महापालिका अतिक्रमण विभाग यावर काय कारवाई करणार? याकडे   सर्वांचे लक्ष्य लागले आहे