Apmc Election Result 2023 : महाराष्ट्रात कुठली APMC कुणाच्या हाती? अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली, आता पर्यंतचे निकाल नमेके काय? APMC कुणाची? वाचा सविस्तर*
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या
निवडणुकींचा धुराळा उडाला. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं आधीच स्पष्ट झालेलं. तर उर्वरित 235 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींचा धुराळा उडणार असल्याची माहिती समोर आलेली. यापैकी 147 बाजार समित्यांसाठी आज मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी ही आज होतेय. विशेष म्हणजे अनेक बाजार समित्यांचे निकालही आता समोर आले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण निवडून येतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. कारण जो निवडणूक जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवरील राजकारणात दबदबा मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते. आतापर्यंत जवळपास दहा पेक्षा जास्त बाजार समितींचा निकाल आमच्या हाती लागला आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोणत्या बाजार समितीत कोणाची बाजू?
1) दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची बाजी
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ नेते संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांचा मोठा विजय मानला जातोय.
2) यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीची बाजी
यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीने गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपला पहिल्यांदाच बाजार समितीत 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली मविआला इथे विजय मिळाला आहे.
3) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बाजार समिती भाजपच्या ताब्यात
महागाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या नाईक परिवाराची सत्ता भाजपने उलथवली आहे. त्यामुळे आता भाजप-शिंदे गटाच्या युतीकडे बाजार समिती गेली आहे. महागावमध्ये भाजप 9 जागी, शिवसेना शिंदे गट 2 जागी तर काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा, असा निकाल समोर आला आहे. बाजार समितीत सत्तापालट करण्यात आमदार नामदेव ससाणेंना मोठं यश आलं आहे.
4) यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत युतीला झटका, मविआची बाजी
यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का बसला आहे. बाभूळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला 13 तर भाजप-शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे.
5) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीला दिंडोरीतून विजयी मिळण्यास सुरुवात झालीय. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे.
6) नाशिक जिल्ह्यातील देवळामध्ये शेतकरी विकास पॅनलची सरशी
देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची सरशी बघायला मिळतेय. शेतकरी विकास पॅनलला सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
7) अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश
अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांना चांगला विजय मिळाला आहे. या बाजार समितीत यशोमती ठाकूर यांच्या गटाला तब्बल 18 जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे. निकाल समोर आल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष केला जातोय.
8) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपची बाजी
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल समोर आलाय. मंगळवेढा बाजार समिती भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याकडे गेली आहे. या बाजार समितीत आवताडे यांना 13 जागा बिनविरोध तर 5 जागांसाठी आज मतदान पार पडले. आता भाजपाचे आमदार अमाधान आवताडे यांच्याकडे 18 जागा आहेत.

9) राहुरीबाजार समितीत सुजय विखे पाटील यांना धक्का
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरेच ‘दादा’ ठरल्याचं सिद्ध झालं आहे. प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना चांगलाच शह दिला आहे. त्यामुळे आता राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता आली आहे. या निवडणुकीत तनपूरे गटाचा दणदणीत विजय झालाय. तनपूर गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत विजय संपादीक केलाय.
10) नाशिक जिल्ह्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलची बाजी
नाशिक जिल्ह्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व बघायला मिळत आहे. शेतकरी विकास पॅनलला 18 पैकी 16 जागेवर विजय मिळाला आहे. तर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
11) यवतमाळमाळ जिल्ह्यातील वणी बाजार समितीत भाजप-शिंदे गटाची बाजी
यवतमाळमाळ जिल्ह्यातील वणी बाजार समितीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागेवर विजयी संपादीत केला आहे. तर महाविकास आघाडीला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना हा झटका मानला जातोय. तर भाजपला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बाजार समितीत मोठे यश आले आहे.
12) पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची बाजी, दिलीप मोहिते पाटील विजयी
पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाने बाजी मारली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय एकत्र येवून थेट लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण त्यांचा या निवडणुकीत विजय झालाय. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे. तसेच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
13) भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचीच बाजी, काँग्रेसची सर्वपक्षीयांना धोबीपछाड
पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसने बाजी मारली आहे. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेस विरोधात सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी झालीय. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी हा गड राखला आहे. निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसचं वरचढ ठरली आहे. या विजयानंतर फटाके फोडत, गुलाल उधळत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय.
14) लातूर कृषी बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा काँग्रेसच्या
लातूर कृषी बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपाप्रणित पॅनलला इथे एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लातूर बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. निकालानंतर आमदार धिरज देशमूख यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.