मोठा निर्णय! APMCतील सभापती व उपसभापती यांच्या मानधन व भत्त्यात वाढ – पणन संचालक विकास रसाळ यांचा नवा आदेश

- गेल्या 5 वर्षांनंतर अखेर भत्त्यात वाढ सभापती, उपसभापतींना मोठा दिलासा”
पुणे: राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळ सदस्यांच्या मानधन, प्रवासभत्ता आणि रोजभत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पणन संचालक विकास रसाळ यांनी सदर आदेश जारी केला आहे .महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम २१ (अ) अंतर्गत   सुधारित दर जाहीर करण्यात आले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून भत्त्यात वाढ न झाल्याने सभापती, उपसभापती आणि सदस्यांकडून शासनाकडे सातत्याने मागणी होत होती. वाढती महागाई, इंधनदर, प्रवासखर्च या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दर काय असेल पाहूया या रिपोर्ट मध्ये…
नवे मानधन दर (वार्षिक उत्पन्नावर आधारित) :
• २५ कोटीपेक्षा जास्त उत्पन्नाच्या समित्या → सभापती रु.२५,००० / उपसभापती रु.१२,५००
• १० ते २५ कोटी उत्पन्न → सभापती रु.२२,००० / उपसभापती रु.११,०००
• ५ ते १० कोटी उत्पन्न → सभापती रु.१९,००० / उपसभापती रु.९,५००
• २५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न → सभापती रु.५,००० / उपसभापती रु.२,५००
प्रवासभत्ता :
• ग्रामपंचायत क्षेत्र – रु.७००
• नगरपरिषद क्षेत्र – रु.१,०००
• महानगरपालिका क्षेत्र – रु.१,५००
• राज्याबाहेरील प्रवास – रु.२,०००
सभा बैठक भत्ता :
• १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न – रु.२,०००
• ५० लाख ते १ कोटी – रु.१,५००
• २५ ते ५० लाख – रु.१,०००
• २५ लाखांखाली – रु.७००
1. तोट्यातील बाजार समित्यांना २०१९ चे जुने दरच लागू राहतील.
2. एका दिवशी कितीही सभा झाल्या तरी एकाच बैठक भत्त्याची तरतूद.
3. वाढीव खर्चाचा कोणताही भार शासन उचलणार नाही.
“बाजार समित्यांनी आर्थिक ताळमेळ साधत पदाधिकाऱ्यांना सुधारित मानधन द्यावे”, असे आदेश पणन संचालक विकास रसाळ यांनी स्पष्ट केले.