APMC NEWS IMPACT: बातमी नंतर अखेर मुंबई APMC प्रशासनाला आली जाग ; हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकणाऱ्यांवर होणार कारवाई
- ज्या राज्यातून आंबा येणार,ज्या नावाने त्याची आवक होणार, त्याच नावाने विक्री करण्याचे आदेश
- फळ मार्केटचे उपसचिव यांनी काढले   ग्राहकांची फसवणूक   न करण्याचे आदेश
- फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंबाचा   नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री करून ग्राहकांची फसवणूक!
- ६ वेळा परिपत्रक   काढूनसुद्धा उघडपणे होतो आंबाच्या अदलाबदली ,उप सचिव जाणूनबुझून करतात दुर्लक्ष
- फळ मार्केटचे उपसचिव यांनी काढलेल्या आदेशाचे पालन होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष
Apmc News Update: मुंबई Apmc होलसेल फळ मार्किटमधे कोकणातील हापूस आंबाच्या नावाने कर्नाटक आंबा   ग्राहकाना विकला जातोय,अशी बातमी Apmc News डिजिटल चॅनलने बातमी दाखवल्यानंतर मार्केट उप सचिवांनी एक परिपत्रक काढले आहे .
पत्रकात म्हटले आहे की फळ बाजार आवारातील व्यापाऱ्यांकडे येत असलेला आंबा हा त्या त्या राज्याच्या नावासह व आंब्याच्या जातीसह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस या नावाने बाजार आवारात विक्री होऊन ग्राहकाची फसवणूक करत असतात,फळ बाजार आवारात मोठया प्रमाणावर आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आला आहे   व ज्या नावाने त्याची आवक होईल, त्याच नावाने त्याची विक्री करा आणि त्या आंब्यावर लेव्हल लावा , तसेच आंबा पिकविण्यासाठी घातक औषधांचा वापर केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास अगर याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधीतांवर बाजार समितीच्या कायदयातील तदतुदीनुसार कारवाई करण्यात येईल . जर अश्याप्रकारची फसवणूक करून परराज्यातून आलेला आंबा हा त्या राज्याच्या व आंबाच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास किंव्हा याबाबतची तक्रार आल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे फळ मार्केटचे उपसचिव यांनी सांगितले आहे .. परंतू या कार्यालयाच्या असे निदर्शनास आलेले आहे की, इतर जातीचे आंबे हापूसच्या नावाखाली विकण्याचे प्रकार वाढत आहेत. पेटीमध्ये वर हापूस आणि खाली रायवळ कनार्टक आंबे देण्याचे प्रकार होत आहेत.अशा प्रकारचे पत्रक दरवर्षीच निघत असतात परंतु आता पर्यंत बाजार समिती प्रशासन कुठलीही कठोर कारवाई केली नाही त्यामुळे कारवाई होतो मात्र कागदावरच अशी चर्चा बाजारवारत सुरु आहे .
मुंबई APMC फळ मार्केट्मधे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची [Hapoos Mango]   देवगड, रत्नागिरी येथून आवक सुरु झाली असून मार्केट मध्ये सुमारे ५० हजार हापूसच्या पेट्या दाखल होत आहेत.. त्याशिवाय केरळ व कर्नाटकातूनही आंबा येतो.कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत मुंबई APMC फळ मार्केट मध्ये जवळपास ५० टक्के   व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक   करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात .हापूसच्या पेट्यात कर्नाटक आंब्या भरून विक्री करतात . हंगामाच्या सुरवातीलाच असा विचित्र प्रकार बाजार आवारात दिसून येत आहे .. कोकणातल्या हापूसचा भाव ४ ते ६ डझन पेटीला २ हजार ते ५ हजार रुपयांना विकली जात आहे..तर कर्नाटकच्या आंब्याचा भाव १०० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे... दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस ड्युप्लिकेट दिला जातोय .
मुंबई apmc फळ मार्केटमध्ये जवळपास ८० टक्के व्यापारी बाहेरचे आहेत आणि ते आंबा हंगामात व्यपाऱ्याचा गाळा भाडेतत्वावर घेऊन व्यापार करत असतात. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात हि टोळी आंब्यांची अदलाबदली करून सगळ्या विंग मध्ये पाठवतात .इतर राज्यातील आंब्याच्या पॅकींगमध्ये रद्दीमध्ये बदल करुन तो आंबा रत्नागिरी, देवगड हापूस कोकणचा पेट्यात टाकून गाळ्यावर थप्पी मारून ठेवले जातोय ही सर्व उघडपणे होत असताना बाजार समिती प्रशासनातर्फे कुठल्याही कारवाई होत नाही त्यामुळे बाजार समिती प्रशासन कारवाईच्या नावाने परिपत्रक काढून आपल्या हाथ बांधून ठेवले दिसून येत आहे . बाजार आवारत असे प्रकार आढळून आल्यास आंबा बाजार समिती जप्त करुन संबधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच अडत्याची परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात येईल.असे म्हटले आहे मात्र प्रत्येक्ष दिसून येत नाही .बाजार समिती प्रशासन भेसळ करणारे व्यापाऱ्यासोबत मिळून शेतकरी व ग्राहकाना फसवणूक करण्याची चित्र दिसत आहे .