APMC NEWS IMPACT | एपीएमसी मार्केट मधील बाजार भावात तफावत बातमीची पणन संचालकांकडून दखल
मुंबई APMC भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये बाजार समितीकडून देण्यात येणारा बाजारभाव व प्रत्यक्षात मार्केटमध्ये असलेले भाज्यांच्या दारात तफावतीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक, सेस चोरी, महागड्या भाज्यांचा दरपत्रकात समावेश नसणे आणि मार्केटमध्ये अनधिकृत शेतमालाचा व्यापार सुरु असल्याची बातमी सतत APMC NEWS डिजिटल कडून दाखवली जात आहे. सदर बातमीची दखल राज्याच्या पणन संचालकांनी घेतली असून या बाबत मुंबई apmc चे सचिव राजेश भुसारी यांना खुलासा मागणारे पत्र पाठविण्यात आले   आहे.
मुंबई apmc मध्ये सेस चोरी , बाजारभावात तफावत, बाजार आवारात अनधिकृत व्यापार या सारख्या गोष्टी जोर धरत असताना देखील मार्केटच्या सचिवांकडून मात्र वारंवार सगळं ओके मध्ये असल्याच   सांगण्यात येत आहे. मुंबई apmc भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये बाजार भावातील ताफवतीमुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच apmc न्यूज डिजिटल च्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. त्या अनुषंगानेच १७ जुलै रोजी पणन संचालनालयाकडून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना खुलासा मागणारे पत्र देण्यात आलं आहे. यामध्ये मार्केटच्या सचिवानी सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठविण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी देखिल अशा बर्याच तक्रारी पणन संचालकाकडे आल्या होत्या. त्या अनुशंगाने पणन संचालकाडून बाजार समितीला वारंवार पत्र देण्यात येत आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आलेली नाही . मुंबई apmc सचिवाकडून पणन संचालकाला जो खुलासा देण्यात येत आहे, तो केवळ दिशाभूल करण्यासाठी आहे. मार्केटची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे   यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.